26.2 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeमहाराष्ट्रशिवसेनेची अवस्था एक टुकडा इधर, एक टुकडा उधर

शिवसेनेची अवस्था एक टुकडा इधर, एक टुकडा उधर

एकमत ऑनलाईन

मुंबई : एकनाथ शिंदेंच्या बंडाळीनंतर राज्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. एकीकडे मुंबई, दिल्ली आणि गुवाहाटी अशा तीन ठिकाणी राजकीय घडामोडींना वेग आलेला असतानाच दुसरीकडे बंडाळीमुळे अस्थिर झाल्याचं चित्र निर्माण झालेल्या राज्य सरकारवर विरोधकांकडून टीका देखील केली जात आहे.

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी आज माध्यमांशी बोलताना सध्याची राजकीय परिस्थिती आणि संजय राऊतांच्या ईडी चौकशीसंदर्भात प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी संजय राऊतांना खोचक टोला देखील लगावला.

दरम्यान, यावेळी बोलताना किरीट सोमय्यांनी आज सामनाच्या अग्रलेखातून भाजपावर करण्यात आलेल्या टीकेचा देखील समाचार घेतला. ‘‘महाराष्ट्राला तीन तुकड्यांमध्ये विभागण्याचा डाव आहे’’, अशी टिप्पणी सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली होती. त्यावर बोलताना किरीट सोमय्यांनी शिवसेनेवर खोचक टीका केली आहे.

‘‘शिवसेनेचेच तुकडे तुकडे झाले आहेत. एक तुकडा इधर, एक तुकडा उधर आणि उद्धव ठाकरेंकडे राहिलेल्या हिश्श्यात जो तुकडा आलाय, त्यात एक डझन आमदारही दिसत नाहीयेत. आधी त्याच्याकडे बघा. १० दिवसांपूर्वीपर्यंत शिवसेनेचे आमदार म्हणायचे, आमचे नेता उद्धव ठाकरे नॉट रीचेबल आहेत. आज ठाकरेंची दयनीय अवस्था अशी आहे की एकही आमदार उद्धव ठाकरेंना रीचेबल नाहीये’’, असं सोमय्या यावेळी म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या