मुंबई : एकनाथ शिंदे गटातील शिवसेनेचे बंडखोर आमदार हे दलित आणि वंचितविरोधी असल्याचा आरोप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (खरात गट) नेते सचिन खरात यांनी केला आहे. मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलताना खरात यांनी महाविकास आघाडी सरकार हे शाहू, फुले, आंबेडकरांच्या तत्वावर काम करत असल्याचं या बंडखोर शिवसेना आमदारांना पहावलं नाही, असा आरोप केला.
हे बंडखोर आमदार स्वत: हिंदूत्व मानत असल्याचं आपल्याला वाटतं असंही खरात म्हणालेत. त्यांनी बंडखोर आमदारांचं नेतृत्व करणा-या एकनाथ शिंदेंवरही टीका केलीय.
ज्या वेळेस राज्यात महाविकास आघाडी सरकार आलं आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री तसेच अजित पवार उपमुख्यमंत्री झाले त्यानंतर काही कालावधीमध्ये महाराष्ट्रावर करोनाचं संकट आलं, असं खरात यांनी म्हटलेआहे. ‘‘हे सरकार आल्यानंतर काही कालावधीमध्येच महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कोरोनाची लाट पसलेली होती.
त्या कालावधीमध्ये राज्य सरकार मोठ्याआर्थिक संकटामध्ये सापडलेलं असतानाही दादारमधील इंदू मीलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्मारक होतंय त्याचं काम या सरकारने सुरु ठेवलं आणि ते आजही सुरु आहे,’’ असं खरात यांनी म्हटलंय.