27.4 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeमहाराष्ट्रगड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी शिवप्रेमी आक्रमक

गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी शिवप्रेमी आक्रमक

एकमत ऑनलाईन

 मुंबईत राज्यभरातील शिवप्रेमींचे आंदोलन

मुंबई : राज्यातील गड-किल्ल्यांची फार दुरवस्था झाली आहे. या पार्श्वभूमीवर शिवप्रेमी आक्रमक झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करावे, या मागणीसाठी आज मुंबईमध्ये आंदोलन सुरू आहे. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली.

आंदोलक सीएसएमटी येथून मंत्रालयाकडे रवाना झाले. मात्र, या आंदोलकांना रोखण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला. पहाटेपासून या आंदोलनासाठी राज्यभरातून शिवप्रेमी जमायला सुरुवात झाली होती. सुमारे ५०० आंदोलक सध्या मंत्रालयाच्या दिशेने कूच करत आहेत. मात्र, पोलिसांनी आंदोलकांना अडवले आहे.

फोर्ट येथील चाफेकर बंधू चौकामध्ये सगळे आंदोलक जमा झाले आहेत आणि संपूर्ण रस्ता ब्लॉक करण्यात आला आहे. या सर्व आंदोलकांना पोलिस समजावण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र आंदोलक ऐकायला तयार नाहीत. पोलिस आणि आंदोलकांमध्ये झटापटी सुरू आहे. सर्व आंदोलकांना आझाद मैदानात जाण्यास पोलिस विनंती करत आहेत, मात्र आंदोलक ऐकायला तयार नाहीत. महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, नगर या जिल्ह्यातून जास्त शिवप्रेमी आंदोलनासाठी जमले आहेत.

चाफेकर चौकात आंदोलकांचा ठिय्या

गेल्या एक तासापासून गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी आंदोलन करणारे शिवप्रेमी चाफेकर बंधू चौकात ठाण मांडून बसलेले आहेत. गड संवर्धनासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करावे ही मुख्य मागणी या आंदोलकांची आहे. मंत्र्यांच्या बंगल्यांना किल्ल्यांची नावे देण्यात आलेली आहेत. सर्व शिवप्रेमींना मंत्रालयाच्या बाहेर आणि किल्ल्यांची नावे असलेल्या मंत्र्यांच्या बंगले असलेल्या ठिकाणी जायचे आहे. पण पोलिसांनी आंदोलकांना रोखले आहे. पोलिस आंदोलकांना आझाद मैदान येथे आंदोलन करण्यास सांगत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या