शरद पवार यांचे गौरवोद्गार
पुणे : शिवछत्रपती शिवाजी महाराज एक आदर्श राजे होते. त्यांनी शून्यातून स्वराज्य उभे केले. त्यांचे विचार आजही सगळ््यांच्या मनात आहेत. मात्र, अजूनही समाजात जातीधर्माचा विचार होतो, अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी सोमवारी व्यक्त केली.
पुण्यात भूगाव येथे सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे आयोजित शिवराज्यभूषण पुरस्कार सोहळ््यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना पुरस्कार देण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मंत्री हसन मुश्रीफ यांना काम करण्याची जेव्हा संधी मिळाली, तेव्हा त्यांनी त्याचे सोने केले आहे.हसन मुश्रीफ जिथून निवडून येतात, तिथे त्यांच्या समाजातील लोक फार कमी आहेत. त्यांच्या मतदारसंघातून बहुजन समाजाचे नेतृत्व मुश्रीफ करत आहे. केवळ त्यांच्या समाजापुरते ते मर्यादित नाही. त्यांच्याबद्दल आमचा अंदाज कधी चुकला नाही. आज हसन मुश्रीफ यांनी हजारो रुग्णांना बरे केले आहे, असे गौरवोद्गार काढले.
सत्ता असो किंवा नसो पण त्या रुग्णांना घरी आणून त्यानंतर हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊन ही सेवा मुश्रीफ यांनी केली. त्यांनी त्यांच्या मतदारसंघात अनेक योजना सुरू केल्या आहेत, ज्या देशातील कुठल्याच राज्यात नाहीत. त्यामुळे त्यांच्या विरोधात कितीही कोणी आंदोलन केले तरी प्रामाणिक लोक काम करणा-यांना निवडून देतात हे दिसून येते.