24.2 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeयेऊरच्या टेकडीवर फडकला बंडाचा झेंडा!

येऊरच्या टेकडीवर फडकला बंडाचा झेंडा!

एकमत ऑनलाईन

ठाणे : महाराष्ट्रात सुरू असलेला सत्तासंघर्ष आणि शिवसेनेतील बंडाचे केंद्र हे सुरत आणि सध्या गुवाहाटी चर्चेत असले तरी या बंडाचे उगमस्थान हे मुंबई जवळ होते. येऊरच्या टेकडीवर एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा फडकावला होता. तथापि, त्याची माहिती सत्तेत असलेल्या पक्षाच्या धुरिणांना कशी काय नव्हती? आणि एकनाथ शिंदेंसोबत शिवसेनेतील इतके आमदार एकाचवेळी कसे काय जाऊ शकतात? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील हा प्रश्न उपस्थित करीत आश्चर्य व्यक्त केले. अशातच एकनाथ शिंदे यांच्या बंडाचे अंतिम नियोजन हे शिवसेनेच्याच बालेकिल्ल्यात झाल्याचे समोर आले आहे.

महाराष्ट्र विधान परिषदेचे मतदान सोमवारी दुपारी ४ वाजता संपल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या काही आमदारांसह ठाण्यातील येऊर टेकडीजवळील उपवन येथे अघोषित दौरा केला होता. येथेच त्यांनी सुरतला जाण्यापूर्वी पुढचे पाऊल निश्चित केले.

राज्यसभा आणि विधान परिषद या महत्वाच्या निवडणुकीच्या वेळी शिंदे यांना बाजूला केल्यामुळे स्वाभाविकच ते नाराज झाले होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला अर्थसंकल्पीय तरतुदींमध्ये सिंहाचा वाटा कसा मिळतो, शिवसेनेला का नाही? ही बाब त्यांना सलत होती. अखेर मतदान झाल्यानंतर काही आमदारांसह शिंदे येऊरच्या उपवनात पोहोचले आणि जेवणासोबत सांगोपांग चर्चा झाली.

या बैठकीत नाराजी जाहीर करायची ठरवले आणि ते सुरतला रवाना झाले, असे निकटवर्तीयांनी सांगितले. शिंदे यांच्या निकटवर्तीय समजल्या जाणा-या ठाणे सेनेच्या आणखी एका कार्यकर्त्याने गेल्या काही काळात ही नाराजी वाढल्याचे सांगितले. बंड ही तातडीची प्रतिक्रिया असण्याची शक्यता मुळीच नाही. बंड करण्याची शक्यता आधीपासून होती पण कदाचित राज्यसभा आणि परिषद निवडणुकांमुळे ते पुढे ढकलले गेले असू शकते, शेवटच्या क्षणी ठाण्यातील काही निवडक सहका-यांना शिंदेंच्या योजनांची माहिती होती. त्यांच्यासोबत प्रवास आणि राहण्याच्या व्यवस्थेवर देखरेख ठेवण्यासाठी तसेच सोबत असलेल्या नाराज आमदारांची चांगली काळजी घेतली जाईल याची व्यवस्था करण्यास सांगितले गेले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या