24.2 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeक्रीडाशोएब अख्तर फेकी बॉलिंग करायचा : सेहवाग

शोएब अख्तर फेकी बॉलिंग करायचा : सेहवाग

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : इंडियन प्रीमिअर लीगमध्ये सनरायझर्स हैदराबादचा खेळाडू आणि ‘जम्मू एक्सप्रेस’ उमरान मलिक याचा वेग पाहून पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर याला चांगल्याच मिर्च्या झोंबल्या होत्या. माझा विक्रम मोडताना स्वत:ची हाडे मोडून घेऊ नको, असे कुचकट विधान शोएब अख्तर याने केले होते. आता त्याला टीम इंडियाचा माजी विस्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग याने उत्तर दिले आहे. सेहवागने शोएब अख्तर फेकी बॉलिंग करायचा, असे एका मुलाखतीमध्ये म्हटले आहे.

शोएब अख्तरला माहिती होते की त्याचा कोपरा वाकतोय आणि आपण फेकी बॉलिंग करतोय. अन्यथा आयसीसीने त्याच्यावर बंदी का घातली असती? असा सवाल वीरेंद्र सेहवागने उपस्थित करत त्याच्या याच अ‍ॅक्शनमुळे त्याला खेळणे अवघड होते असेही तो म्हणाला. एक-दोन चेंडूवर त्याला चौकार-षटकार पडला की तो बीमर किंवा यॉर्कर टाकायचा, असेही वीरू म्हणाला.

ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली योग्य पद्धतीने गोलंदाजी करायचा, त्यामुळे त्याचा चेंडू खेळणे तुलनेने सोपे असायचे. परंतु शोएब अख्तरचा हात कसा येईल आणि तो कसा टाकेल याचा अंदाज येत नव्हता, असेही वीरू म्हणाला. तसेच सध्याच्या घडीला मुंबई इंडियन्सचा गोलंदाजी प्रशिक्षक आणि न्यूझिलंडचा वेगवान गोलंदाज शेन बॉण्ड याचा चेंडू समजणे अवघड होते. त्याचा चेंडू शरीराकडे वेगाने यायचा, मग भलेही तो ऑफ स्टम्पच्या बाहेरून का गोलंदाजी करत असेना, असेही वीरूने सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या