24.4 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeमहाराष्ट्रवीज दरवाढीचा शॉक!

वीज दरवाढीचा शॉक!

एकमत ऑनलाईन

मुंबई : आधीच महागाईने होरपळलेल्या सामान्य जनतेसाठी आणखी एक शॉक देणारी बातमी आहे. महावितरणने इंधन समायोजन आकार म्हणजे एफएसी यामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ केली आहे. त्यामुळे यापुढे ग्राहकांना जादा आकाराने वीज खरेदी करावी लागणार आहे. त्यामुळे या दर वाढीचा थेट फटका राज्यातील ग्राहकांना बसणार आहे.

कोळसा आणि इंधनाचे दर वाढल्यानंतर इंधन समायोजन आकारामध्ये महावितरणकडून वाढ करण्यात येत असते. त्याला एमईआरसी यांची परवानगी असते. जून महिन्यापासून ऑक्टोबर महिन्यापर्यंत जो इंधन समायोजन आकार आहे त्यामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे पुढील पाच महिन्यासाठी ही दरवाढ करण्यात आली आहे. मार्च २०२२ ते मे २०२२ पर्यंत जो इंधन समायोजन आकार होता त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने सध्याचा एफएसी वाढवला आहे. जानेवारी २०२२ मध्ये देखील महावितरणकडून प्रति युनिट २५ पैशांची दरवाढ करण्यात आली होती. त्यावेळी देखील महावितणने समायोजन आकाराचेच कारण दिले होते.

कोरोनातून सावरत असतानाच जनतेला वाढत्या महागाईला सामोरे जावे लागत आहे. इंधनाचे दर प्रचंड वाढल्यामुळे सर्वच वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. त्यातच आता वीजेच्या दरामध्ये मोठी वाढ झाल्यामुळे आधीच महागाईच्या गर्तेत अडकलेल्या सामान्य जनतेच्या खिशाला आणखी कात्री लागणार आहे. नुकतेच गॅसचे दर देखील ५० रूपयांनी वाढले आहेत. वाढत्या महागाईमुळे बजेट कोलमडलं आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या