25 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeराष्ट्रीय5जी स्पेक्ट्रम लिलावापूर्वी अंबानी-मित्तल यांना झटका

5जी स्पेक्ट्रम लिलावापूर्वी अंबानी-मित्तल यांना झटका

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाने 5जी स्पेक्ट्रमच्या लिलावाला मंजुरी दिलीे. या अंतर्गत जुलै अखेर ७२०९७.८५ मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रमचा लिलाव केला जाणार आहे. या अंतर्गत ६००, ७००, ८००, १८००, २१००, २३०० आणि २५०० मेगाहर्टझ बँडचा लिलाव होणार आहे. लिलावासाठी स्पेक्ट्रमची एकूण किंमत ५ लाख कोटी रुपये ठेवण्यात आली आहे.

मात्र, सरकारने स्पेक्ट्रमबाबतच्या निर्णयामुळे मुकेश अंबानींच्या रिलायन्स जिओ, सुनील मित्तल यांच्या एअरटेलसारख्या बड्या टेलिकॉम कंपन्यांना मोठा फटका बसला आहे.

दरम्यान, 5जी स्पेक्ट्रमच्या रिझर्व्ह प्राईसमध्ये कोणताही बदल झालेला नाही, तर दूरसंचार कंपन्या रिझर्व्ह प्राईसमध्ये कपात करण्याची सातत्याने मागणी करत होत्या. रिझर्व्ह प्राईस अधिक राहिल्यास 5जी स्पेक्ट्रमसाठी बोली लावणार नाही, असेही भारती एअरटेलने यापूर्वी म्हटले होते.
दूरसंचार कंपन्यांच्या मागणीनुसार दूरसंचार नियामक ट्रायने 5जी स्पेक्ट्रमच्या रिझर्व्ह प्राईसमध्ये ३९ टक्क्यांपर्यंत कपात करण्याची शिफारसही केली होती. मात्र, रिझर्व्ह प्राईसमध्ये कोणताही बदल केलेला नाही.

ऑक्टोबरपासून 5जी? : भारतात लवकरच 5जी इंटरनेट सेवा सुरू होणार आहे. सरकारने त्याच्या लिलावास मंजुरी दिली असून केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी ही घोषणा केली. 5जी स्पेक्ट्रम लिलावासाठी ८ जुलैपासून अर्ज सुरू होतील आणि २६ जुलैपासून लिलाव सुरू होईल. यावर्षी ऑक्टोबरपासून 5जी सेवा सुरू करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या