24 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeक्रीडाबांगलादेशला धक्का, श्रीलंका सुपर-४ मध्ये

बांगलादेशला धक्का, श्रीलंका सुपर-४ मध्ये

एकमत ऑनलाईन

दुबई : श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यातील आजचा सामना चांगलाच चुरशीचा झाला. श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यातील सामना निर्णायक होता. कारण या सामन्यातील पराभवाने एक संघ स्पर्धेबाहेर जाणार होता, तर दुसरा सुपर-४ फेरीत पोहोचणार होता. त्यामुळे या सामन्यात कोण विजयी ठरणार, याची उत्सुकता सर्वांना होती. बांगलादेशने यावेळी श्रीलंकेपुढे १८४ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या कुशल मेंडिसने ६० धावांची खेळी साकारली. पण तो बाद झाला आणि सामना अखेरच्या षटकापर्यंत रंगला. अखेरच्या षटकात श्रीलंकेने बांगलादेशवर दोन विकेट्स राखून विजय साकारला. या विजयासह श्रीलंकेचा संघ सुपर-४ मध्ये दाखल झाला, तर बांगलादेशचा संघ स्पर्धेतून बाहेर झाला आहे.

श्रीलंकेच्या संघाने टॉस जिंकला आणि बांगलादेशला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. पण बांगलादेशच्या संघाने या संधीचा चांगला फायदा घेतला. कारण बांगलादेशचा सलामीवीर मेहंदी हसन मिरजने संघाला दमदार सुरुवात करून दिली. मिराजने यावेळी २६ चेंडूंत ३८ धावांची खेळी साकारली. त्यानंतर कर्णधार शकिब अल हसनने २४ धावा करत संघाची धावगती वाढवली. पण त्यानंतर अफिफ हुसेनने बांगलादेशच्या धावगतीचा चांगलाच वेग मिळवून दिला. अफिफने यावेळी २२ चेंडूंत ३९ धावांची धडाकेबाज खेळी साकारली. त्यानंतर मोसादेक होसेनने ९ चेंडूंत नाबाद २४ धावांची तुफानी खेळी साकारली आणि त्यामुळेच बांगलादेशला १८३ धावांची मजल मारता आली.

बांगलादेशच्या १८४ धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेला कुशल मेंडिसने धमाकेदार सुरुवात करून दिली. कुशलने फक्त आक्रमक फटकेबाजी केली नाही तर त्याने आपले अर्धशतक पूर्ण केले आणि संघाचे आव्हान जीवंत ठेवले. पण कुशलला मधल्या फळीतील फलंदाजांकडून चांगली साथ मिळाली नाही. त्यामुळे हा सामना नेमका कोणता संघ जिंकणार, याची उत्सुकता वाढली होती. कुशल मेंडिसने यावेळी ३७ चेंडूंत चार चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ६० धावांची दमदार खेळी साकारली. पण मोक्याच्या क्षणी तो बाद झाला. त्यानंतर कर्णधार दानुन शनाकाने संघाची जबाबदारी आप्लया खांद्यावर घेतली आणि चांगली फटकेबाजी केली. दासुन शनाका हा ४५ धावांवर बाद झाला आणि पुन्हा एकदा श्रीलंकेला धक्का बसला. त्यामुळे हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला आणि अखेर श्रीलंकेने विजयावर शिक्कामोर्तब करीत सुपर ४ मध्ये धडक दिली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या