नांदेड:प्रतिनिधी
जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच आहे. शनिवारी सांयकाळपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार, ९ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. त्यामुळे कोरोनाबाधितांचा एकूण आकडा १२५ वर पोहोचला आहे.
ग्रामीण रुग्णालय बारड येथील कोवीड सेंटर येथील १ रुग्ण व डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील २ रुग्ण असे एकुण ३ रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आतापर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ५५ रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे व उर्वरीत ६२ रुग्णांवर औषध उपचार चालू आहे. शनिवार २३ मे रोजीची कोरोना संशयीत व कोविड रुग्णांचा संक्षीप्त माहिती पुढील प्रमाणे आहे. सर्वेक्षण १ लाख ३१ हजार ४०७, घेतलेले स्वॅब ३ हजार ८२, निगेटिव्ह स्वॅब २ हजार ७४०, आज रोजी पॉझिटिव्ह स्वॅब संख्या ३ + ६, एकुण पॉझिटिव्ह रुग्ण १२५, स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या ११९, स्वॅब नाकारण्यात आले आहेत.
Read More खेळाडू व पंचांसाठी कठोर नियम
प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या एकूण १३५ अहवालापैकी १२० अहवाल शनिवार दि.२३ मे रोजी सायंकाळी सहा वाजता प्राप्त झाले. यामध्ये सहा जणांचे स्वॅब कोरोना पॉझिटिव्ह आले असून जिल्ह्यातील रूग्णांची संख्या आता १२५ वर गेली आहे. यामध्ये तीन महिला व तीन पुरूषांचा समावेश असून करबलानगर येथील दोन व कुंभारटेकडी दोन परिसरताल आहेत. यात सहा वर्षाच्या चिमुकलीचा सुद्धा समावेश आहे. तसेच मुखेड येथील उपजिल्हा रूग्णालय येथील दोन असे सहा रूग्णांचा समावेश आहे. आत्तापर्यंत ५५ जणांना रूग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर उर्वरित ६२ रूग्णांवर औषधोपचार सुरू आहेत.
जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती बाळगू नये आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि प्रशासनास सहकार्य करावे. तसेच सर्व जनतेने आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करुन घ्यावे जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे अॅप सतर्क करण्यास मदत करते, असे आवाहन नांदेडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.