मुंबई : मुंबईच्या गोरेगावमधील पत्राचाळ प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना आज पुन्हा एकदा ईडीच्या विशेष कोर्टामध्ये हजर करण्यात आले. संजय राऊत यांना कोर्टाने झटका दिला असून कोठडीमध्ये वाढ केली आहे. संजय राऊत यांना मुंबई सत्र न्यायालयातील विशेष ईडी न्यायालयाने सोमवार दिनांक ८ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे.
पत्राचाळ प्रकरणामध्ये संजय साऊत यांना ईडीने चार ऑगस्ट रोजी अटक केली होती त्यानंतर कोर्टात हजर केले असता ३ दिवसांची कोठडी सुनावली होती. आज कोठडी संपल्यामुळे पुन्हा एकदा संजय राऊत यांना विशेष इडी कोर्टात हजर केले.
संजय राऊत कोर्टात धनुष्य बाण चिन्ह असलेला भगवा मफलर घालून आले होते तो मफलर त्यांनी काढला जेव्हा त्यांना लक्षात आले की, ते कोर्टात आले. त्यानंतर सुनावणी सुरू झाली. तपासात नवीन आर्थिक व्यवहारांची माहिती समोर आलीये तसंच काही व्यक्तींची आणि संजय राऊत यांची समोरासमोर बसवून चौकशी करायची आहे.
याकरता कोठडीत वाढ करुन देण्यात आली आहे. अलिबाग येथे जमिन घेतली तेव्हा जमिन मालकाला १.१७ कोटी रुपये रोख दिल्याचे ईडीने तपासात उघड झाल्याने सांगितले आहे.