23.8 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeपरभणीधक्कादायक : परभणीत 25 वर्षीय तरुणाचा उष्माघातामुळे मृत्यू

धक्कादायक : परभणीत 25 वर्षीय तरुणाचा उष्माघातामुळे मृत्यू

एकमत ऑनलाईन

उन्हाची तिव्रता वाढली; काळजी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

Parbhani

परभणी :परभणीत उष्माघातामुळे एक 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. तरुणाचे नाव माणिकराव वैद्य असून तो दिवसभर उन्हात शेतात काम करत होता.

झरी तालुक्यातील येथील प्रसिध्द हॉटेल चक्रधऱचे मालक माणिकराव दादाराव वैद्य (25) यांचा मंगळवारी दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास उष्णाघातामुळे मृत्यू झाला. लॉकडाऊनच्या पार्श्‍वभूमीवर हॉटेल व्यवसाय पूर्णतः बंद असल्याने माणिकराव वैद्य सकाळी शेतावर गेले होते. शेतात ते पर्‍हाट्या वेचण्याचे काम करत होते. मंगळवारी या परिसरात उष्णतेची लाट उसळल्याने काम थांबून ते दुपारचे जेवण केल्यानंतर पुन्हा कामास लागले होते. तेव्हाच त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने ते मोटारसायकलद्वारे गावी घरी परतले. त्याच वेळी अचानक त्यांना चक्कर आली, त्यात ते जागीच मृत्यू पावले. त्याच्या या आकस्मिक निधनाने परिवारास मोठा धक्का बसला असून परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या वडिलाचे अलीकडेच निधन झाले होते. दरम्यान, माणिकराव वैद्य यांच्या पश्‍चात आई, पत्नी, भाऊ, दोन अपत्य असे परिवार आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या