22.3 C
Latur
Wednesday, August 17, 2022
Homeऔरंगाबादधक्कादायक! औरंगाबादमध्ये आज आढळले ५२ कोरोनाबाधित रुग्ण

धक्कादायक! औरंगाबादमध्ये आज आढळले ५२ कोरोनाबाधित रुग्ण

एकमत ऑनलाईन

औरंगाबाद: औरंगाबादमध्ये कोरोनाचा बळींवर बळी जात असून खासगी रुग्णालयात आज (ता. २९) ६५ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला. आता एकूण बळींचा आकडा ६९ झाला. सलग सहा दिवस कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर आज ५२ कोरोनाबाधित रुग्णांना लागण झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले. गुरुवारी (ता. २८) ४५ रुग्ण वाढले असून दोन दिवसातच ९७ जण बाधित आढळले. आता कोरोनाबाधितांची संख्या १ हजार ४५९ झाली आहे.

खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या हडको एन-१२ येथील ६५ वर्षीय पुरुषाचा आज (ता. २९) सायंकाळी सहाच्या सुमारास मृत्यू झाला. त्यांना २१ मे रोजी रुग्णालयात भरती करण्यात आले होते.त्यांची कोरोना चाचणी २३ मे रोजी पॉझिटीव्ह आली. त्यांना कोवीडच्या बाधेसह न्युमोनिया झाला व त्यांना मधुमेहही होता.

Read More  पालकमंत्री सुभाष देसाई यांचा उद्या औरंगाबाद दौरा; जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा घेणार आढावा

आनंदाची बातमी : आतापर्यंत ९३७ जण झाले कोरोनामुक्त
दरम्यान औरंगाबादमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असला तरी आनंदाची बातमी म्हणजे औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातून (घाटी) ९ रुग्ण, जिल्हा रुग्णालयातून १२ रुग्ण आज बरे होऊन घरी परतले आहेत. यासह येथील आधीचे, महापालिकेच्या कोविड केअर केंद्रे, खासगी रुग्णालये येथून आतापर्यंत एकूण ९३७ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतलेले आहेत.

आज आढळलेले ५२ रुग्णांचा तपशील
नेहरू नगर, कटकट गेट (१), कैलास नगर, माळी गल्ली (१), एन सहा सिडको (१), भूषण नगर, पहाडे कॉर्नर (१), कैलाश नगर (२), श्रीनिकेतन कॉलनी (१), खडकेश्वर (१), उस्मानपुरा (१), खंडोबा मंदिर, सातारा गाव (२), इटखेडा (३), उस्मानपुरा (३), जुना बाजार (१), विश्रांती कॉलनी एन २ (३), नारळी बाग गल्ली नं.२ (१), राशेदपुरा, गणेश कॉलनी (१), शिवशंकर कॉलनी, गल्ली नं.१ (१), बायजीपुरा गल्ली नं.२ (१), एन 4 विवेकानंद नगर,सिडको (१), शिवाजी नगर (१), एन सहा संभाजी कॉलनी (१), गजानन नगर एन ११ हडको (५), भवानी नगर, जुना मोंढा (१), जुना बायजीपुरा (२), किराडपुरा (१), रोशनगेट (१), राशीदपुरा (१), मोतीवाला नगर (1), जुना बाझार, अझिम कॉलनी (१), बायजीपुरा (२), एन सहा चिश्तिया कॉलनी (१), मंझूरपुरा (१) , राम नगर (१), दौलताबाद (२), वाळूज सिडको (२), राम नगर, कन्नड (२) या भागातील कोरानाबाधित आहेत. यामध्ये १८ महिला आणि ३४ पुरुष रुग्णांचा समावेश आहे.

मराठवाड्यात ८९ नवे कोरोनाग्रस्त

मराठवाड्यात शुक्रवारी ८९ नवे रुग्ण, तर ३ रुग्णांचा मृत्यू नोंदवण्यात आला. नांदेड येथे गुरुवारी मृत महिलेचा कोरोना अहवाल शुक्रवारी पॉझिटिव्ह आला. जिल्ह्यात इतर ५ जणांचेही अहवाल पॉझिटिव्ह आले. उस्मानाबादेत उमरगा उपजिल्हा रुग्णालयात एका ६० वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला, तर दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. लातुरात १० रुग्ण सापडले. परभणीतही ७ रुग्णांची भर पडली. जालना जिल्ह्यात शुक्रवारी दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. बीडमध्येही रात्री उशिरा एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. हिंगोलीमध्ये ५ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या