25 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeराष्ट्रीयधक्कादायक ! देशभरात एकाच दिवसात आढळले 9,300 कोरोनाबाधित, तर 260 जणांचा मृत्यू

धक्कादायक ! देशभरात एकाच दिवसात आढळले 9,300 कोरोनाबाधित, तर 260 जणांचा मृत्यू

एकमत ऑनलाईन

मुंबई : देशातील कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात सातत्याने वाढ होत असून देशभरात मागील 24 तासात 9304 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. कोरोनाबाधितांची ही वाढ आतापर्यंतची 24 तासातील सर्वाधिक वाढ आहे. तर 260 जणांचा गेल्या 24 तासात मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार देशातील कोरोनाबाधितांचा आकडा आता 2 लाख 16 हजार 919 वर पोहचला आहे. त्यापैकी 5 हजार 815 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 1 लाख 4 हजार 107 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. गेल्या 24 तासात 3 हजार 804 कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. देशाचा रिकव्हरी रेट 47.99 टक्के आहे. सध्या देशात कोरोनाची लागण असलेले म्हणजेच अॅक्टिव्ह रुग्ण 1 लाख 6 हजार 737 आहेत.

Read More  मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी प्रचंड जोरदार पाऊस

देशभरातील कोरोनाबाधितांची सर्वाधिक रुग्णसंख्या महाराष्ट्रात असून महाराष्ट्रात सध्या कोरोनाबाधितांचा आकडा 74860 झाला आहे. त्यातील 32329 बरे झाले आहेत. तर राज्यात आतापर्यंत 2587 जण मृत्यूमुखी पडले आहेत. राज्यात काल कोरोनाच्या तब्बल 2560 नवीन रुग्णांची नोंद झाली असून राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 74,860 वर गेली आहे. या पैकी सध्या राज्यात 39,935 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. दरम्यान, काल राज्यात 122 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 2587 जणांचा मृत्यू झाला आहे. काल 916 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्याचा रुग्ण बरे होण्याचा प्रमाण 43.18 टक्के आहे. राज्यातील मृत्यू दर 3.45 टक्के आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या