23.1 C
Latur
Sunday, February 28, 2021
Home धक्कादायक : पत्नी, मुलगा आणि मुलीवर गोळ्या झाडून सीआरपीएफ जवानाने केली आत्महत्या

धक्कादायक : पत्नी, मुलगा आणि मुलीवर गोळ्या झाडून सीआरपीएफ जवानाने केली आत्महत्या

एकमत ऑनलाईन

परिसरात खळबळ : पंख्याला गळफास लावून आत्महत्या

प्रयागराज : उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये शनिवारी एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे राहणाऱ्या एका सीआरपीएफ जवानाने पत्नी आणि दोन मुलांवर गोळ्या झाडून स्वतः आत्महत्या केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. विनोद कुमार यादव असे सीआरपीएफ जवानचे नाव होते. तसेच त्यांच्या मुलाचे नाव संदीप आणि मुलीचे नाव सिमरन होते.

Read More  सामाजिक कार्यकर्त्या सविताताई रणदिवे यांना उपमुख्यमंत्र्याकडून श्रध्दाजंली

मिळालेल्या माहितीनुसार, विनोद कुमार यादव हे सीआरपीएफमध्ये ड्रायव्हर म्हणून कार्यरत होते. ते आपली पत्नी विमल यादव मुलगी आणि मुलासह प्रयागराज येथे राहत होते. शनिवारी सकाळी विनोद यांनी आपल्या परवाना पिस्तूलने पत्नी, मुलगी आणि मुलावर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. यानंतर त्यांनी पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. गोळी झाडल्याचा आवाज एकूण शेजारी जेव्हा त्यांच्या घराकडे जमले तेव्हा त्यांना हे चौघे मृत अवस्थेत दिसले. शेजाऱ्यांनी याची माहिती पोलिसांना दिली असता पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,437FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या