तीनवेळा त्यांनी हिंगोली-नांदेड लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्वही केलं
नांदेड : मनसेचे नेते हर्षवर्धन जाधव यांनी राजकीय संन्यास घेतल्याची बातमी ताजी असतनाच आता ज्येष्ठ नेत्या आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील यांनी राजकारणातून संन्यास घेतला आहे.
फेसबुकच्या माध्यमातून भावनिक पोस्ट लिहून सूर्यकांता पाटील यांनी आपला निर्णय जाहीर केला. 43 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीला त्यांनी अखेर पूर्णविराम दिला आहे. आता आजूबाजूला असणारे लोक अनोळखी वाटत आहेत आणि अश्या अनोख्या प्रांतात माझ्यासारखी मनस्वी रमू शकत नाही. राजीनामा लिहून तयार होता पण मी आहेच कोण म्हणून एवढा शो करायचा’ असं त्यांनी फेसबुकवर लिहिले आहे.
Read More हाँगकाँग सुरक्षा विधेयकाला मंजुरी
पाटील यांनी काँग्रेसमधून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यानंतर २०१४मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. चार वेळा खासदार, एकदा आमदार आणि केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री, संसदीय कार्य राज्यमंत्री आदी विविध पदे त्यांनी भूषिविली आहेत. १९८०मध्ये हदगाव विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या पाटील या १९८६मध्ये राज्यसभेवर निवडून गेल्या होत्या. त्यानंतर तीनवेळा त्यांनी हिंगोली-नांदेड लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्वही केलं आहे.