भिवंडी : भिवंडी शहरातील कामतघर परिसरात देखील अशीच घटना घटली आहे. एका तरुणानं आपल्या वडिलांवर मटण कापण्याच्या सुऱ्यानं सपासप वार करून त्यांची हत्या केली आहे. गुरुनाथ पाटील (वय- 68 ) असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव असून ते शिवसेनेचे माजी शाखाप्रमुख होते. धक्कादायक म्हणजे गुरूनाथ पाटील यांनी हत्या पोटच्या मुलानं केली आहे. हे हत्याकांड कौटुंबिक वादातून झाल्याची माहिती मिळाली आहे. ब्रिजेश पाटील असं हत्या करणाऱ्या मुलाचं नाव असून त्याला नारपोली पोलिसांनी अटक केली आहे.
गुरुनाथ पाटील हे आपल्या घरात झोपले असताना ब्रिजेश याने मटण कापण्याच्या सुऱ्यानं वडिलांच्या मान आणि तोंडावर सपासप वार केले. यात गुरुनाथ पाटील यांचा जागेवरच मृत्यू झाला. गुरुनाथ पाटील यांचे त्यांच्या मुलांसोबत वर्षभरापासून कौटुंबीक वाद होते. त्याबाबत गुरुनाथ पाटील यांनी वेळोवेळी नारपोली पोलिसांकडे मुलाविरोधात तक्रार केली होती. परंतु पोलिसांना आरोपी मुलाला त्याबाबत अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करून त्याला सोडून दिलं होतं. त्याच मुलानं गुरूनाथ पाटील यांची आज हत्या केली आहे.
नारपोली पोलिसांनी हत्येच्या घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी आयजीएम रुग्णालयात पाठवण्यात आला आहेय दरम्यान, पोलिसांनी आरोपी मुलगा ब्रिजेश पाटील याला अटक केली असून त्याच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. गुरूनाथ पाटील यांनी मुलाविरोधात नारपोली पोलिसांत वारंवार तक्रार केली होता. मात्र, पोलिसांनी आरोपी ब्रिजेश याच्या विरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करून त्याला सोडून दिलं होतं. पोलिसांनी आरोपीवर गंभीर कारवाई केली असती तर आज ही दुर्दैवी घटना घडली नसती, अशी प्रतिक्रिया स्थानिक नगरसेवक माजी उपमहापौर मनोज काटेकर यांनी दिली आहे. दरम्यान, कामतघर परिसात शिवसेना पक्षाच्या विकासासाठी गुरुनाथ पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
शेरास सव्वाशेर, राजस्थान जिंकले