28 C
Latur
Wednesday, April 14, 2021
Homeहिंगोलीधक्कादायक : हिंगोली 6 नवे रुग्ण आढळले

धक्कादायक : हिंगोली 6 नवे रुग्ण आढळले

एकमत ऑनलाईन

कोरोनाबाधितांची संख्या 107 वर : इतर जिल्ह्यातून परतणाऱ्या नागरिकांमुळे जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव वाढण्याची भीती

हिंगोली :हिंगोली जिल्ह्यात औंढा नागनाथ तालुक्यातील एक तर वसमत तालुक्यातील 5 अशा एकूण 6 जणांचा कोरोना चाचणी अहवाल शनिवारी पॉझिटिव्ह आला आहे. हे सर्व रुग्ण त्यांच्या मुंबईहून परतले आहेत. इतर जिल्ह्यातून परतणाऱ्या नागरिकांमुळे जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

Read More  पूनम महाजन यांच्यातर्फे अग्नी योद्ध्यांना ३ हजार पीपीई किट्स

हिंगोली जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 107 झाली असून 89 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर 18 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. हिंगोली शहरासह जिल्ह्यात मुंबई, पुणे, औरंगाबाद व इतर शहरांमध्ये कामानिमित्त असलेले नागरिक गावाकडे परतत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. औंढा तालुक्यातील मुंबईहून परत आलेल्या एका 45 वर्षीय व्यक्तीसोबत वसमतमधील 5 व्यक्तींचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. औंढा येथे एक, हिंगोलीमध्ये 2, औरंगाबादला दोन तर वसमतमध्ये 13 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,473FansLike
162FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या