Tuesday, September 26, 2023

सोलापूरातुन धक्कादायक बातमी : कोरोनाची लागण झाल्याने आठ जणांचा मृत्यू

सोलापूर – कोरोनाची लागण झाल्याने शनिवारी आठ जणांचा मृत्यू झाला तर चौदा जणांना कोरोनाची लागण झाल्याचे वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाले अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

आज एकूण २३० जणांचा अहवाल आला. त्यापैकी २१६ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला तर चौदा जणांना कोरोनाची लागण झाली. केगाव येथून इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइन मधून ७५ व्यक्तींना सोडण्यात आले. सोलापुरात आत्तापर्यंत ८६५ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे तर आतापर्यंत ८३ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयात सक्रिय असलेल्या रुग्णांची संख्या ४०२ आहे. रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या बाधितांची संख्या ३८० आहे.

उत्तर कसबा, मरीआई चौक दमाणीनगर, सरवदे नगर, गांधीनगर अक्कलकोट रोड, बुधवार पेठ, जुना विडी घरकुल, आंध्र तालीम लष्कर, मोदी, कुमठा नाका, अंबिका नगर, जुना विडीघरकुल, निलमनगर या परिसरात नवे रुग्ण आढळून आले.

Read More  जी-७ परिषद सप्टेंबरमध्ये होणार, भारताला आमंत्रण मिळणार

आठ जणांना अखेर कोरोनाने गाठले
मयत झालेली पहिली व्यक्ती गांधीनगर अक्कलकोट रोड परिसरातील ४५ वर्षीय पुरुष आहे. मयत झालेली दुसरी व्यक्ती नरसिंहनगर मोदी परिसरातील ६१ वर्षीय महिला आहे. मयत झालेली तिसरी व्यक्ती भवानी पेठ परिसरातील ७२ वर्षीय पुरुष आहे. मयत झालेली चौथी व्यक्ती अवंतीनगर परिसरातील ६९ वर्षीय महिला आहे. मयत झालेली पाचवी व्यक्ती जुना विडी घरकुल परिसरातील ६७ वर्षीय पुरुष आहे. मयत झालेली सहावी व्यक्ती बाळीवेस परिसरातील ६२ वर्षीय महिला आहे. मयत झालेली सातवी व्यक्ती उत्तर कसबा परिसरातील ६१ वर्षीय पुरुष आहे. मयत झालेली आठवी व्यक्ती वेणू गोपाळ नगर परिसरातील ४१ वर्षीय पुरुष आहे.

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या