23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeराष्ट्रीयधक्कादायक बातमी : कोरोना झालेल्या एका प्राण्याचाही मृत्यू

धक्कादायक बातमी : कोरोना झालेल्या एका प्राण्याचाही मृत्यू

एकमत ऑनलाईन

न्यूयॉर्क : जगभरात कित्येक लोकांना कोरोनाव्हायरसची लागण झाली आहे. या व्हायरने अनेकांचा बळी घेतला आहे. माणसंच नव्हे तर प्राण्यांनाही हा व्हायरस झाल्याची काही प्रकरणं गेल्या काही दिवसांमध्ये समोर आली आणि आता कोरोना झालेल्या एका प्राण्याचाही मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.

अमेरिकेत कोरोनाव्हायरसची लागण झालेल्या एका कुत्र्याचा  मृत्यू झाला आहे. जर्मन शेफर्ड जातीचा हा कुत्रा आहे. कोरोनामुळे एखाद्या प्राण्याचा मृत्यू होण्याचं हे पहिलंच प्रकरण आहे.

मृत कुत्र्याचे मालक स्टेनन आयलँडचे रॉबर्ट आणि एलिसन माहनी यांनी नॅशनल जिओग्राफिकला दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा सात वर्षांचा कुत्रा बडीला एप्रिलमध्ये श्वास घ्याययला त्रास होत होतो. एका पशू तज्ज्ञाने मेमध्ये त्याची चाचणी केली त्यावेळी त्याला कोरोना असल्याचं निदान झालं.

रक्ततपासणीत त्याला कॅन्सर असल्याचंही निदान झालं

न्यूयॉर्कमध्ये एका जर्मन शेफर्डला कोरोनाची लागण झाली आणि देशातील हा पहिला कुत्रा आहे ज्याला कोरोनाचं निदान झालं, अशी माहिती अमेरिकेच्या कृषी विभागानेदेखील जूनमध्ये माहिती दिली होती. बडीची प्रकृती खूपच गंभीर होती आणि 11 जुलैला त्याचा मृत्यू झाला. त्याच्या रक्ततपासणीत त्याला कॅन्सर असल्याचंही निदान झालं. त्यामुळे त्याचा मृत्यू कोरोनामुळे झाला की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. न्यूयॉर्क शहराच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं, बडीच्या मृतदेहाचं नेक्रोप्सी केली जाईल. त्यानंतर डॉक्टर याबाबत सविस्तर माहिती देतील.

काही परिस्थितीत माणसांमार्फत हा व्हायरस प्राण्यांमध्ये पसरू शकतो

अमेरिकेत एकूण 24 प्राणी कोरोना पॉझिटिव्ह आहेत. यूएसडीएने दिलेल्या माहितीनुसार देशात 12 कुत्रे, 10 मांजरी, एक वाघ आणि एक सिंह कोरोना संक्रमित आहे. प्राण्यांमार्फत कोरोनाव्हायरस पसरतो की नाही याबाबत अद्याप माहिती नाही. मात्रा व्हायरसमुळे प्राण्यांची प्रकृतीही खूप गंभीर होते आहे. कृषी विभागाने सांगितलं की, प्राण्यांमार्फत कोरोनाव्हायरस पसरत असल्याचे अद्याप पुरावे सापडले नाहीत. मात्र काही परिस्थितीत माणसांमार्फत हा व्हायरस प्राण्यांमध्ये पसरू शकतो.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या