25 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeधक्कादायक : नांदेड जिल्ह्याचा आकडा शंभरी पार

धक्कादायक : नांदेड जिल्ह्याचा आकडा शंभरी पार

एकमत ऑनलाईन

अबचलनगर, करबला, नगिनाघाट, कुंभार टेकडी या भागात रुग्णांची संख्या वाढत आहे

नांदेडची आकडेवारी : एकुण मृत्यू : ५; 30 जणांना घरी सोडण्यात आले; 6 जणांना त्यांची प्रकृती सुधारत असल्याने सुट्टी देण्यात आली आहे.

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील कोरोना विषाणू संसर्गाच्या रुग्णांची संख्या आता शंभरीच्या पार गेली आहे. काल रात्री उशिरा आलेल्या अहवालानंतर आणि आज सायंकाळी प्राप्त अहवालानुसार हा आकडा आता 110 वर पोहोचला आहे. माहूर, बारडनंतर आता कोरोनाने ग्रामीण भागात हातपाय पसरले आहेत. आज प्राप्त झालेल्या अहवालात भोकर, मुखेड येथील रुग्णांचा समावेश आहे.

काल रात्री 11 वाजता आरोग्य विभागाने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात कोरोना बाधीतांची संख्या 106 वर पोहोचली होती. आज सायंकाळी आणखी 4 रूग्णांची भर पडली. त्यामुळे आता नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित रुगणांची संख्या 110 वर गेली आहे.

Read More  अम्फान चक्रीवादळाचा हाहाकार; पश्चिम बंगालमध्ये ७२ जणांचा मृत्यू

मंगळवारी सकाळी करबला भागातील एक रुग्ण पॉझिटीव्ह आढळला होता. त्यानंतर आठ नविन रुग्णांची कालरात्री भर पडली. त्यात सहा पुरुष व दोन महिलांचा समावेश आहे. कुंभार टेकडीच्या युवकाच्या संपर्कात आलेले हे सहा जण पॉझिटीव्ह आले आहेत. अबचलनगर, करबला, नगिनाघाट, कुंभार टेकडी या भागात रुग्णांची संख्या वाढत असल्याचे यामुळे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, आज सायंकाळी आणखी 4 नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. हे रुग्ण मुखेड, भोकर, नांदेड आणि सांगवी भागातील आहेत. यापूर्वी 30 जणांना घरी सोडण्यात आले असून, आज आणखीन 6 जणांना त्यांची प्रकृती सुधारत असल्याने सुट्टी देण्यात आली आहे. तर पाच जणांचा यापूर्वीच मृत्यू झालेला आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या