22.7 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeमहाराष्ट्रआम्ही तुम्हाला पेंग्विन सेना म्हणायचे का?; शेलार यांचा उद्धव ठाकरेंना सवाल

आम्ही तुम्हाला पेंग्विन सेना म्हणायचे का?; शेलार यांचा उद्धव ठाकरेंना सवाल

एकमत ऑनलाईन

मुंबई : मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहित प्रश्न विचारला आहे. ‘आमच्या कमळाला ‘बाई’ म्हणत हिणवता, आम्ही तुम्हाला पेंग्विन सेना म्हणायचं का? ’, असे शेलार म्हणाले आहेत. त्यांनी ट्विट करत उद्धव ठाकरेंना पत्र लिहिले आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे राजकारण चांगलेच पेटले आहे.

शिवसेना आणि भाजपमधील राजकीय संघर्ष आता आणखी वाढण्याची शक्यता आहे. कारण मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेनेला प्रश्न विचारणारे ट्विट केले आहे.

यात त्यांनी उद्धव ठाकरेंना टॅग करत ‘‘कृपया, हे लक्षात असू द्या!’, असे म्हटले आहे. शेलारांनी उद्धव ठाकरेंसाठी एक पत्र लिहिले आहे. त्यात आशिष शेलार म्हणतात, ‘मा. श्री. उध्दवजी ठाकरे, महोदय आपण आमच्या कमळाला हिणवायला ‘बाई’ म्हणताय? हरकत नाही, बाईमध्ये आई, ताई आणि कडक लक्ष्मीपण आहे.

त्यामुळे तुमच्या उरल्यासुरल्या पक्षाला, आम्ही आता ‘पेंग्विन सेना’ म्हणायचे का? ता. क. असे कडक अस्सल मुंबईकर शब्द आमच्याकडे पण आहेत! आपला आ. अ‍ॅड. आशिष शेलार’’ असे पत्र शेलारांनी लिहिले आहे.

मुंबई महापालिका निवडणुका तोंडावर आहेत. भाजप आणि शिंदे गटाची युती झाली आहे.. आशिष शेलार यांच्यावर मुंबईच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे ते आता अधिक आक्रमकपणे विरोधकांवर टीका करताना दिसत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या