33.5 C
Latur
Saturday, June 3, 2023
Homeराष्ट्रीयसिद्धरामय्या यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

सिद्धरामय्या यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

एकमत ऑनलाईन

बंगळुरू : सिद्धरामय्या यांनी शनिवारी दुसऱ्यांदा कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची तर डी.के. शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यासोबतच इतर ८ आमदारांनाही कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. बंगळुरू येथे होणाऱ्या या शपथविधी सोहळ्यात काँग्रेसच्या सर्व बड्या नेत्यांसह विरोधी पक्षाचे दिग्गज नेते या सोहळ्यासाठी उपस्थित होते.

कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशिवाय आमदार सतीश जारकीहोळी, डॉ. जी. परमेश्वरा, केएच मुनियप्पा, केजे जॉर्ज, प्रियांक खरगे, रामलिंगा रेड्डी, जमीर अहमद खान आणि एमबी पाटील यांनी कर्नाटक सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. कर्नाटक मंत्रिमंडळातील मंजूर मंत्र्यांची संख्या ३४ आहे. मंत्रिमंडळात सर्व प्रदेश आणि वर्गाची काळजी घेण्यात आली असून याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्षांसह सर्व प्रमुख नेत्यांशी चर्चा झाली आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ, नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुक अब्दुल्ला आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, महबूबा मुफ्ती बेंगळुरूमध्ये राज्याच्या नवनिर्वाचित मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधी समारंभाला उपस्थित होते.

यासोबतच तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन, कमल हसन, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू उपस्थित होते.

 

Stay Connected

1,567FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या