मुंबई : सेलिब्रिटींचे अफेअर्स, विवाहसोहळे जेवढे गाजतात, किंबहुना त्याहून अधिक गाजतात त्यांचे घटस्फोट. सिनेइंडस्ट्रीत तर असे घटस्फोट समोर आले आहेत की त्यामुळे चाहत्यांना अनेकदा धक्का बसला आहे. कालपरवापर्यंत यांच्यात सगळं गोड होतं मग आता असं अचानक झालं तरी काय? असा प्रश्न एका सामान्य चाहत्याला सतावू लागतो.
नेहमीच बॉलिवूडमध्ये घटस्फोट जास्त होतात असं आपण म्हणत आलोय पण आता तिथलं वारं मराठी इंडस्ट्रीलाही लागल्याचं चित्र आहे. गेली काही दिवस आपल्या सर्वांचा मराठीतला लाडका अभिनेता सिद्धार्थ जाधव याच्या वैवाहिक आयुष्यात काहीतरी बिनसलंय अशी चर्चा होती. पण आता त्याची खात्री देणारी बाब समोर आली आहे.
सिद्धार्थ आणि त्याची पत्नी तृप्ती यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे, अशी चर्चा सध्या सुरू आहे. कारण सिद्धार्थची पत्नी तृप्तीने तिच्या सोशल मीडियावरील नाव बदलून तृप्ती जाधव काढून तृप्ती अक्कलवार असे केले आहे. तिने नावामधील जाधव हे अडनाव हटवल्याने सिद्धार्थ आणि तृप्तीच्या घटस्फोटाबाबत चर्चा सुरू आहे.