24.7 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeमहाराष्ट्रसंवादच नसल्याने सुसंवादाचा विषयच येत नाही

संवादच नसल्याने सुसंवादाचा विषयच येत नाही

एकमत ऑनलाईन

पुणे : मनसेच्या पुणे शहराध्यक्ष पदावरून हटविण्यात आल्यानंतर वसंत मोरे यांना पक्षात टाळले जात असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आणि त्यावर खुद्द वसंत मोरे यांनी स्वत:हून उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. पक्षात शहर पातळीवर मला टाळले जात आहे. त्यामुळे आता राज ठाकरे येतील तेव्हाच मी पक्ष कार्यालयात जाणार, असे वसंत मोरे म्हणाले. शहराध्यक्षपद गेल्यानंतर आज पहिल्यांदाच वसंत मोरे कोअर कमिटीसोबत पोलिस आयुक्तांना भेटायला आले होते. त्यावेळीही कोअर कमिटी आणि मोरे यांच्यात दुरावा पाहायला मिळाला.

पक्षातील कार्यकर्ते आणि आपल्यात संवादच नाही त्यामुळे सुसंवादाचा प्रश्न येत नाही, असे वसंत मोरे म्हणाले. पक्षात शहर पातळीवर आपल्याला टाळले जात असल्याची नाराजी त्यांनी यावेळी बोलून दाखवली.

ग्रुपवर मेसेज होता की राज साहेबांच्या आदेशानुसार मी आज येथे आयुक्तांच्या भेटीसाठी आलो. पण येथे कार्यकर्त्यांमध्ये संवादच नाही. त्यामुळे सुसंवादाचा विषयच येत नाही. मी पक्ष कार्यालयात जाणार नाही. हे मी राज साहेबांनाही सांगितले आहे. ज्यादिवशी राज साहेब येतील त्याच दिवशी पक्ष कार्यालयात जाईन. मी कुणालाही टाळत नाही. पण मला टाळलं जातंय’, असे वसंत मोरे म्हणाले.

लाऊडस्पीकरच्या मुद्यावरून पुण्यातील मनसेच्या शिष्टमंडळाने पोलिस आयुक्तांची भेट घेतली. तर राज्यातील सर्व पदाधिकारी देखील स्थानिक पोलिस अधिका-यांना भेटत आहेत. मुंबईत पोलिस आयुक्तांनी आवाजाबाबत जे पत्र काढले आहे तसेच पत्रक पुणे पोलिस आयुक्तांनीही काढावे अशी मागणी मनसेने यावेळी केली. मनसेचे हे शिष्टमंडळ आधी आयुक्तांना भेटले. त्यानंतर वसंत मोरे पोहोचले. त्यामुळे यावेळीही वसंत मोरे उशिरा पोहोचले. याबाबत विचारण्यात आले असता पार्किंगला जागा मिळाली नाही म्हणून थोडा उशीर झाला, अशी सारवासारव वसंत मोरे यांनी केली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या