नवी दिल्ली : राष्ट्रकुल क्रीडा २०२० मध्ये सुवर्णपदकाची सर्वात मोठी आशा असलेल्या भारतीय बॅडमिंटन संघाची निराशा झाली आहे. मिश्र सांघिक स्पर्धेत अंतिम फेरीत मलेशियाकडून १-३ असा पराभव पत्करावा लागला. अशाप्रकारे टीम इंडियाच्या हातून सलग दुसरे सुवर्णपदक जिंकण्याची संधी निसटली.
मात्र, भारतीय संघ रिकाम्या हातानं परतणार नाही, याची खबरदारी घेतली आणि त्यांनी जिद्दीसह त्यांच्या कामगिरीनं भारताच्या झोळीत रौप्य पदक टाकले. भारताकडून स्टार शटलर पीव्ही सिंधूने एकमेव सामना जिंकला. चार वर्षांपूर्वी २०१८ च्या गोल्ड कोस्ट गेम्समध्ये, भारताने प्रथमच या स्पर्धेचे सुवर्णपदक जिंकले होते.
त्यानंतर भारताने अंतिम फेरीत मलेशियाचा पराभव केला. पुन्हा एकदा दोन्ही संघ आमनेसामने आले, पण यावेळी भारतीय संघाला त्या यशाची पुनरावृत्ती करता आली नाही. अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात मलेशियानं भारताचा पराभव करून सुवर्ण तर ंिजकलेच, पण मागील पराभवाचा हिशेबही बरोबरीत सोडवला.