21.4 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeक्रीडासिंधूला सुवर्ण, भारत चौथ्या क्रमांकावर कायम

सिंधूला सुवर्ण, भारत चौथ्या क्रमांकावर कायम

एकमत ऑनलाईन

बर्मिंगहम : सोमवार दि. ८ ऑगस्ट रोजी कॉमनवेल्थ गेम्स २०२२ चा ११ वा आणि शेवटचा दिवस आहे. दहाव्या दिवशी भारताने पाच सुवर्ण, चार रौप्य आणि सहा कांस्यपदकांसह एकूण १५ पदके जिंकली. भारताच्या खात्यात १९ सुवर्ण असून आज आणखी ५ सुवर्णपदके येऊ शकतात. पीव्ही सिंधूू, लक्ष्य सेन, शरथ कमल, हॉकी संघ आणि सात्विक आणि चिराग शेट्टी ही जोडी सुवर्णपदकासाठी आपले आव्हान सादर करतील. भारताच्या कामगिरीवर नजर टाकली तर १८ सुवर्ण, १५ रौप्य आणि २२ कांस्य अशी एकूण ५५ पदके जिंकली आहेत.

भारताची पदकसंख्या : ५६
१९ सुवर्ण : मीराबाई चानू, जेरेमी लालरिगुंना, अंचिता शेऊली, महिला लॉन बॉल्स संघ, टेबल टेनिस पुरूष संघ, सुधीर (पॅरा वेटलिफ्टिंग), साक्षी मलिक, बजरंग पुनिया, दीपक पुनिया, रवी कुमार दहिया, विनेश फोगाट, नवीन, भाविना(पैरा टेबल टेनिस), नीतू घनघास, अमित पंघाल, एल्डहॉस पॉल, निखत जरीन, श्रीजा आणि पी.व्ही. सिंधू.

१५ रौप्य : संकेत सरगर, ंिबदियाराणी देवी, सुशिला देवी, विकास ठाकूर, भारतीय बॅडंिमटन संघ, तुलिका मान, मुरली श्रीशंकर, अंजू मलिक, प्रियांका गोस्वामी, अविनाश साबळे, पुरूष लॉन बॉल्स संघ, अब्दुल्ला अबोबैकर, शरथ आणि साथियां, सागर अहलावत , भारतीय महिला क्रिकेट संघ.

२२ कांस्य : गुरुराजा पुजारी, विजय कुमार यादव, हरजिंदर कौर, लवप्रीत सिंग, लवप्रीत सिंह, गुरदीप सिंग, तेजस्वीन शंकर, दिव्या काकरन, मोहित ग्रेवाल, जस्मिन, पूजा गेहलोत, पूजा सिहाग, मोहम्मद हुसामुद्दीन, दीपक नेहरा, रोहित टोकस, महिला हॉकी संघ, सौरव घोषाल, संदीप कुमार, अन्नू रानी, सौरव घोषाल-दीपिका, किदाम्बी श्रीकांत, त्रिशा-गायत्री.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या