18.1 C
Latur
Friday, December 2, 2022
Homeमहाराष्ट्रसीतारामन पुन्हा बारामती दौ-यावर

सीतारामन पुन्हा बारामती दौ-यावर

एकमत ऑनलाईन

बारामती : आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीकोनातून भाजपने आतापासूनच मोर्चेबांधणी करण्यासाठी सुरुवात केली असून बारामती लोकसभा मतदारसंघावर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे.

सप्टेंबरनंतर महिन्यात बारामतीच्या दौ-यावर आलेल्या भाजप नेत्या आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या आता पुन्हा पवार कुटुंबाचा बालेकिल्ला किल्ला म्हणून ओळखल्या जाणा-या या मतदारसंघात येणार आहेत.

सीतारामन यांच्या दौ-याच्या पूर्वतयारीसाठी केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल बारामतीत मुक्कामी येणार आहेत. याबाबत भाजप लोकसभा मतदारसंघप्रमुख अविनाश मोटे यांनी माहिती दिली.

अविनाश मोटे म्हणाले, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा नोव्हेंबरच्या अखेरचा आठवडा किंवा डिसेंबरच्या पहिल्याच आठवड्यात बारामतीतील दुसरा दौरा आयोजित करण्यात येत आहे.

त्याची पूर्वतयारी आम्ही आतापासूनच सुरू केली आहे. या दौ-यासाठी केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल बारामतीत ११ आणि १२ नोव्हेंबर रोजी मुक्कामी येणार आहेत. ११ तारखेला खडकवासला, भोर, पुरंदर, जेजुरीवरुन पटेल हे बारामती येथे येणार आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या