अहमदपूर : तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण येथे नव्हता पण मुंबई येथून गावाकडे आलेल्या नागरिकांमुळेच या तालुक्यात चक्क सहा रुग्ण आढळून आले आहेत .तर आणखी चार रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी लातूर येथे पाठविण्यात आले असून चोवीस जणांना क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरजमल सिंहाते यांनी दै एकमतशी बोलते वेळी माहिती दिली.
अहमदपूर तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण आहे मुंबई येथून आलेल्या नागरिकांमध्ये हा विषाणू असल्याचे दिसून येत आहे .त्यामुळे अहमदपूर शहरात मुख्य बाजारपेठेचा भाग सतत गजबजलेला असतो म्हणून नगर परिषदेने मुख्य बाजारपेठेत कोणी वाहने घेऊन जाऊ नये, लोकांची गर्दी होऊ नये ,म्हणून सर्व प्रमुख रस्त्यांची नाकेबंदी केली आहे .सध्या शहरात खरेदीच्या नावाखाली लोकांची खूपच गर्दी वाढलेली पहावयास मिळत आहे. पूर्वीप्रमाणे शहरात नागरिकांची गर्दी होत असून सोशल डिस्टन्ससिंगचा वापर केला जात नाही व नागरिकांना ही कोरोनाची भीती वाटत नसल्याचे दिसून येते.

Read More मेजर सुमन गावनी यांना युएनचा मिलिट्री जेंडर ऍडव्होकेट पुरस्कार
तालुक्यातील खंडाळी येथील तीन रुग्ण, मांडणी येथे दोन रुग्ण तर पाटोदा येथे एक असे एकूण सहा रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळले असून चार रुग्णांचे स्वॅब लातूर येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले असून याचा रिपोर्ट रात्रीपर्यंत येणार असल्याचे सांगण्यात आले. या तालुक्यातील सहा कोरोना रुग्णांपैकी दोन रुग्ण लातूर येथे उपचार घेत आहेत .तर मांडणीचे दोन रुग्ण व पाटोदा येथील एक रुग्ण अहमदपूर येथील क्वारंटाइन सेंटरमध्ये उपचारात असून ते उपचारांना प्रतिसाद देत असल्याचे डॉक्टर सुरजमल सिहाते यांनी सांगितले.
या तालुक्याचे क्वारंटाईन सेंटर मरशिवणी येथील समाजकल्याणच्या शाळेत तयार करण्यात आले आहे. येथे २४ व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात आले आहे. या तालुक्यात परगावाहून येणाºया नागरिकांमुळेच रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दिवसेंदिवस रुग्ण वाढत आहेत. कोरोना व्हायरसने ग्रामीण भागात हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. ग्रामीण भागात कोरोनाने प्रवेश केल्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घरातच- सुरक्षित रहा ,आपण बाहेर तर कोरोना घरात आल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे आपण घरातच राहावे असे आवाहन आमदार बाबासाहेब पाटील ,माजी आमदार विनायकराव पाटील, जि. प. सदस्य माधवराव जाधव, सामाजिक कार्यकर्ते शरद जोशी आदींनी केले आहे.