बीड, 29 मे : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी ट्विट आणि फेसबुक पोस्ट करून स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या 3 जूनच्या पुण्यातिथी कार्यक्रमासंदर्भात जनतेला भावनिक साद घातली आहे. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीला तुम्ही घरातच त्यांच्या आवडीचा पदार्थ बनवा आणि त्यांच्या फोटोसमोर दोन दिवे लावा असं आवाहन पंकजा मुंडे यांनी केलं आहे.
3 जूनला पुण्यतिथीचा कार्यक्रम गडावर होईल पण यावर्षी कोणीतीही गर्दी करायची नाही. दर्शनासाठी नाही आणि मला भेटण्यासाठीदेखील नाही. कोरोनाच्या संकटामुळे आपल्याला नियमांचं पालन करायचं आहे. गडावर मोजक्याच लोकांमध्ये कार्यक्रम पार पडेल पण त्यांचं लाईव्ह सोशल मीडियाच्या माध्यमातून दाखवलं जाईल असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.
Read More विंडोज १० चं नवं अपडेट आता उपलब्ध
3 जून रोजी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा सहावा पुण्यस्मरण दिवस आहे. हा दिवस ‘संघर्ष दिन’ म्हणून मुंडे समर्थक साजरा करतात. पण सध्या राज्यावर कोरोनाचं सावट आहे. या रोगाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी संपूर्ण देशामध्ये लॉकडाऊन करण्यात आलं आहे. बीडमध्येही लॉकडाऊन आहे. ‘सध्या कोरोनाच्या या थैमानात सर्वांना प्रतिकार शक्ती व उत्तम आरोग्य लाभो हीच माझी प्रार्थना आणि शुभेच्छा आहे आणि त्यानुसारच 3 जूनचं नियोजन असणार आहे’ असं पंकजा मुंडे म्हणाल्या. पण खरंतर ‘3 जून उजाडलाच नाही पाहिजे असे वाटते असंही त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे.’
‘गडाचा कार्यक्रम साधा व मोजक्या लोकांत असेल तो Live दाखवता येईल. त्यामुशे तुम्ही सर्वांनी कुटुंबासमवेत मुंडे साहेबांच्या फोटोसमोर उजव्या बाजूला घरातील महिला आणि डाव्या बाजूला पुरुष उभे राहून दोन दिवे/समई लावायच्या आहेत. साहेबांचा आवडा पदार्थ बनवा. तर कोणतही एक समाज कार्य करायचं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मदत, अन्नदान, रक्तदान, मास्क किंवा औषधाचे वाटप इत्यादी.. सर्व कुटुंबीयांनी हे सर्व करतानाचे फोटो माझ्या फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामवर पाठवायचे आहेत.’ असं आवाहन पंकजा मुंडे यांनी केलं आहे.
03 जुन, लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांचे पुण्यस्मरण.
एक आवाहन..!#SangharshDin pic.twitter.com/pfbqHwwXaY— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) May 29, 2020