24.7 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeपरभणीझरी येथे शेतात आढळला अनोळखी व्यक्तीचा सांगाडा

झरी येथे शेतात आढळला अनोळखी व्यक्तीचा सांगाडा

एकमत ऑनलाईन

परभणी : झरी तालुका जिल्हा परभणी झरी पासून एक किमी अंतरावर खानापूर हे गाव आहे तेथील ज्ञानोबा जाधव यांच्या शेतातील अज्ञात व्यक्तीचे प्रेताच्या हाड शनिवार दि. ७ मे रोजी सकाळी दिसून आले आहे. त्यानंतर न्यानोबा जाधव यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यामध्ये माहिती दिली माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

त्या इसमाचे शरीराचे डोक्याचे हाड कमरेचे हाड व दात असे दिसून आले त्या इसमाच्या अंगामध्ये करड्या रंगाची जीन्स पॅन्ट अंडर पॅन्ट लाल रंगाची चप्पल कंपनीची इत्यादी वस्तू तेथे पोलिसांना आढळून आले आहे. तसेच या इसमाचे त्याचे मास कुत्र्यांनी संपूर्णपणे खाऊन घेतले पोलिस निरीक्षक प्रवीण सोमवंशी पोलिस उपनिरीक्षक बालप्रसाद चव्हाण पोलिस कर्मचारी ए. एस. टेहरे शरद पवार फड आर. पी. मुंडे तसेच पोलिस उप विभागीय अधिकारी शिरतोडे यांनी पाहणी करून पूर्ण हाड जमा करून डी. एन. ए. चाचणीसाठी नेले आहेत. या प्रकरणांमधील एक बेवारस मोटार सायकल पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. त्या गाडीचे क्रमांक एम एच ३८ एस ७८२६ असा आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या