काबुल : अफगाणिस्तान-इराणच्या सैन्यात रविवारी पाण्यावरून हिंसक चकमक झाली. दोन्ही देशांत इस्लामिक रिपब्लिक सीमेवर जोरदार गोळीबार झाला. इराणच्या सिस्तान व बलुचिस्तान तथा अफगाणच्या निमरोझ प्रांताच्या सीमेवर ही लढाई झाली. त्यात एका तालिबान्यासह इराणचे ३ सैनिक मारले गेले. दोन्ही देशांत हेलमंड नदीच्या पाण्यावरुन वाद सुरू आहे. इराणी मीडिया ने या गोळीबारासाठी तालिबानला जबाबदार धरले. तर तालिबानने हे युद्ध इराणने सुरू केल्याचा दावा केला.