वॉशिंग्टन : अमेरिकेत जॉर्ज फ्लाइड यांच्या मृत्यूनंतर प्रचंड हिंसाचार उफाळला आहे. अमेरिकनं नागरीक रस्त्यावर उतरत पोलिसांनी केलेल्या कृत्याविरोधात तीव्र रोष व्यक्त करत आहेत. त्यात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक वक्तव्य केलं होतं. त्यावरून ह्यूस्टनचे पोलीस दलाच्या प्रमुखांनी ट्रम्प यांना शांत बसण्याचा सल्ला दिला आहे
जर तुमच्याकडं सांगण्यासारखं काही नसेल, तर तोंड बंद ठेवा, अशा शब्दात पोलीस अधिकाऱ्याने ट्रम्प यांना सुनावलं आहे. मिनियापोलीस शहरात जॉर्ज फ्लॉइड या आफ्रिकन वंशाच्या कृष्णवर्णीय व्यक्तीचा पोलिसांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला. जॉर्ज फ्लॉइड यांना अटक करताना पोलीस अधिकाऱ्यानं त्यांची मान गुडघ्यानं दाबून धरली होती. यात त्यांचा श्वास कोंडल्यानं मृत्यू झाला.
Read More चार दिवसात रुग्ण कोरोनामुक्त झाल्याचा रशियाचा निष्कर्ष
या घटनेचा व्हिडीओ सोशल माध्यमांमध्ये व्हायरल झाल्यानंतर अमेरिकेत हिंसाचाराचा उद्रेक झाला. हिंसाचारावर बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत टीका केली होती. टेक्सॉस प्रातांतील मिनियापोलीस शहराच्या गव्हर्नरशी बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी बळाचा वापर करून हिंसाचार शांत करण्याचा सल्ला दिला होता.
ट्रम्प यांनी दिलेल्या सल्ल्यानंतर ह्यूस्टन पोलीस प्रमुख आर्ट असीवेदो यांनी ट्रम्प यांना गप्प बसण्याचा सल्ला दिला आहे.