23.2 C
Latur
Saturday, September 25, 2021
Homeआंतरराष्ट्रीयतर पाकला बघून घेऊ

तर पाकला बघून घेऊ

एकमत ऑनलाईन

वॉशिंग्टन : पाकिस्तानने तालिबान्यांना केलेली मदत आणि अफगाणिस्तानसंदर्भात घेतलेली भूमिका आता महागात पडण्याची चिन्हे दिसत आहेत. अमेरिकेने पाकिस्तानसोबतच्या संबंधांवर विचार केला जाणार असल्याचे म्हटले आहे. केवळ आपल्याच नाही तर भारताकडून अफगाणिस्तानसंदर्भात केल्या जाणा-या प्रयत्नांमध्ये अडथळा आणणारी पाकिस्तानची भूमिका असेल तर बघून घेऊ अशी भूमिका अमेरिकेच्या स्टेट सेक्रेटींनी व्यक्त केली आहे.

मागील काही काळापासून पाकिस्तानचा अफगाणिस्तानमधील हस्तक्षेप वाढल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने थेट पाकिस्तानचा उल्लेख करत जशास तसे उत्तर मिळेल असा सूचक इशारा पाकिस्तानला आणि पर्यायाने सत्ताधारी इम्रान खान सरकारला दिला आहे. मागील २० वर्षांमध्ये तसेच त्यापूर्वीही पाकिस्तानने अफगाणिस्तानसंदर्भात घेतलेल्या भूमिकेनुसार त्यांनी अफगाणिस्तानच्या भविष्याबद्दल सातत्याने दावे केल्याचे दिसून आले. त्यांनी तालिबान्यांना आश्रय दिला. ज्यामध्ये हक्कांनी समुहातील तालिबान्यांचाही समावेश होता, असे अमेरिकन स्टेट सेक्रेटरी अँथनी ब्लिंकेन म्हणाले आहेत.

पाकवर कटाक्षाने लक्ष ठेवणार
पाकिस्तानने अशी भूमिका घेण्यामागे त्यांचे काही विशिष्ट हेतू असतील आणि त्यापैकी काही अफगाणिस्तानसंदर्भातील आमच्या तसेच भारत अफगाणिस्तानमध्ये बजावत असणा-या भूमिकेविरोधात जाणारे असतील तर आम्ही त्याकडे नक्कीच कटाक्षाने लक्ष देणार आहोत, असेही अमेरिकने थेट शब्दात सांगितले आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या