27.4 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeमहाराष्ट्र.....तर त्यांच्या सोबत एकत्र यायला तयार

…..तर त्यांच्या सोबत एकत्र यायला तयार

एकमत ऑनलाईन

 फडणवीस – चव्हाण भेटीवर दानवे यांची प्रतिक्रिया
मुंबई : गणेशोत्सवातील गाठीभेटींमुळे राज्यात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा सुरु असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांची भेट झाल्यानं या भेटीची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. यावर ‘आता आम्हाला कोणता दुसरा राजकीय पक्ष फोडण्यात इंटरेस्ट नाही’. आता भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान दानवे यांनी म्हटले आहे की, आम्हाला कोणता दुसरा राजकीय पक्ष फोडण्यात इंटरेस्ट नाही. भारतीय जनता पार्टी कोणता पक्ष फोडत नाही. पण कोणत्या पक्षात फूट पडून ते आम्हाला मदत करायला येत असतील तर त्यांच्या सोबत एकत्र यायला तयार आहोत. आज आम्हाला कोणाची गरज नाही. कोणी आपल्या पक्षात असंतुष्ट होत आमच्या पक्षात आलं तर स्वागत आहे. आमच्या विचारांशी सहमत व्हावं. ही वैचारिक लढाई आहे, आता अशोक चव्हाण यांची चर्चा आहे.

लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची सुरवात स्वातंत्र्य काळात सर्वांनी एकत्र येण्याच्या उद्देशाने केली होती. आता गणपती उत्सवामध्ये सर्वच जण एकमेकांकडे जातात. देवेंद्र फडणवीस आणि अशोक चव्हाण यांची एका त्रयस्थ व्यक्तीच्या घरी भेट झाली. त्याचे असे अर्थ लावण्यात आले. त्यांच्यामध्ये असंतोष असेल तरी त्याचा आम्ही आता काही उपयोग करणार नाही. पण आम्हाला जेव्हा गरज पडेल उपयोग होईल. तेव्हा आम्ही असंतुष्टांचा उपयोग करून घेऊ, असं दानवे यांनी म्हटले आहे.

केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हायवे दिवे येथील निवासस्थानी गणरायाच्या दर्शनासाठी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड यांनी रात्री भेट देत गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी दानवे बोलत होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या