24.2 C
Latur
Tuesday, November 30, 2021
Homeआंतरराष्ट्रीयतर आम्ही अमेरिकेची मदत घेऊ

तर आम्ही अमेरिकेची मदत घेऊ

एकमत ऑनलाईन

बीजिंग (वृत्तसंस्था) : दक्षिण चीन समुद्रात सुरू असलेल्या युद्धाभ्यासावेळी अमेरिका आणि चीनमध्ये तणाव वाढू लागला होता. यावर चीनने आपल्या सैनिकांना नरमाईचे आदेश दिले असून अमेरिकी सैन्यावर कोणत्याही परिस्थितीत पहिली गोळी चालवू नका, असे निर्देश दिले आहेत. अमेरिकेचे आरोग्य मंत्री चार दशकांनंतर तैवानच्या दौ-यावर असताना चीनचे हे आदेश आले आहेत. दक्षिण समुद्रातील वादग्रस्त भागात सध्या चीन आणि अमेरिका दोन्ही देश सैन्याची ताकद वाढवू लागले आहेत. यानंतर आता एका छोट्या देशाने चीनला थेट इशारा दिला आहे.

फिलिपीन्सने चीनला इशाला दिला आहे. चीनने आमच्या नौदलावर हल्ला केला तर आम्ही अमेरिकेची मदत घेऊ असं फिलिपीन्सने म्हटलं आहे. फिलिपीन्सचे परराष्ट्र मंत्री टेओडोरो लोकसिन यांनी चीनने आमच्यावर हल्ला केला तर आम्ही अमेरिकेबरोबर केलेल्या सुरक्षा करारानुसार त्यांची मदत घेऊ असं म्हटलं आहे. याआधी फिलिपीन्सचे राष्ट्रपती रोड्रिगो डुटेर्टे यांनी देशातील सरकार या वादामध्ये अमेरिकेची मदत घेणार नाही असं म्हटलं होतं.

फिलिपीन्स आणि चीनमध्ये दक्षिण चीनच्या समुद्रातील सीमेवरुन सुरू असणा-या वादातूनच मनीलामधून पेइचिंगला हा इशारा देण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. परराष्ट्र मंत्री लोकसिन यांनी आमच्या वायुसेनेची विमाने या पुढेही दक्षिण चीनच्या समुद्रावर नजर ठेवतील. फिलिपीन्सने दिलेला हा इशारा म्हणजेच उगाच आम्हाला प्रवृत्त करण्याचा प्रकार असल्याचे चीनने म्हटले आहे. आम्ही अनधिकृत काम करत असल्याचा त्यांचा दावा आहे. आम्ही त्यांची विचारसरणी बदलू शकत नाही. आधीच ते न्यायालयामध्ये पराभूत झालेत असं देखील लोकसिन यांनी म्हटलं आहे.

‘ब्लॅक पँथर’ फेम चाडविक बोसमॅनचे निधन; 43 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या