22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeलातूरभगवंतने बनविले टोल वसुलीसाठी सॉफ्टवेअर

भगवंतने बनविले टोल वसुलीसाठी सॉफ्टवेअर

एकमत ऑनलाईन

जळकोट तालुक्यातील तरुण, पाटोदा बु. येथील रहिवासी, प्रोजेक्ट देशात टॉप फाईव्हमध्ये, १० लाखांचे बक्षीस

जळकोट : ओमकार सोनटक्के

बंंगळुरु येथे नुकत्याच झालेल्या मन्थन नॅशनल कॉन्फरन्स कार्यक्रमात बॅरियर लेस फ्री फ्लो टोलिंग ग्रॅन्डमध्ये जळकोट तालुक्यातील पाटोदा बुद्रुक येथील भगवंत विष्णुकांत गुणाले यांच्या अ‍ॅटिव्ह मेटा प्रा. लि. (सिव्हील्स) च्या स्टार्टअपची देशातील पहिल्या ५ स्टार्टअपमध्ये निवड झाली असून केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी व केंद्रीय राज्यमंत्री व्ही. के. सिंग यांच्या हस्ते १० लाखांचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

बॅरियर लेस फ्री फ्लो टोलिंग ग्रॅन्ड चॅलेज हे गाडी न थांबता टोल वसुली करणे व जेवढे किलोमीटर राष्ट्रीय महामार्ग वापरला गेला. तितकेच टोल वसूल करण्यासाठी मेलिटी स्टार्टअप हब व आयएचएमसीएलद्वारे आयोजित करण्यात आले होते. देशातील सर्व स्टार्टअप्स व कंपन्यांसाठी हे खुले होते.

जळकोट तालुक्यातील पाटोदा बु. येथील भगवंत गुणाले यांनी सिव्हील्स अंतर्गतई-इस्टिमेशन, ई बिलिंग, ई-रिपोर्टस आणि ई-लॉटरी हे सॉफ्टवेअर सार्वजनिक बांधकाम विभाग, पाटबंधारे विभाग, महानगरपालिका आदी विभागांना गतिमान करण्यासाठी फार महत्वाचे असून यातील पहिला प्रकल्प ई-इस्टिमेशन सार्वजनिक बांधकाम विभाग येथे पायलट अंतर्गत राबविण्यात आला आहे. यामध्ये पहिल्या वर्षातच ८५० हून अधिक अभियंते स्वेच्छेने सहभागी झाले असून रु. ८००० कोटींहून अधिक किंमत असलेली १० हजारांहून अधिक अंदाजपत्रके बनली गेली आहेत. रियलसाईन या प्रकल्पाद्वारे आता मोबाईल अ‍ॅपमधून डिजिटल सही केली जाते. रियलसाईनद्वारे शासनाचे सर्व डिजिटल कागदपत्रे एकदम सुरक्षित होऊन जातात. यासंबंधी विदेशी सॉफ्टवेअर्सवरील अवलंबित्व कमी होते. तसेच संर्पूर्ण जगात याचा वापर केला जाऊ शकतो.

स्पीड टोल प्रकल्प टोल वसुली ग्रँड चॅलेंजसाठी सबमिट केला होता. या प्रकल्पातून टोल नाक्यावर बसविण्यात गेलेला अकस्मार्टफोन कॅमेरा व ड्रायव्हरच्या स्मार्टफोनमधील जीपीएसद्वारे टोल वसुली करण्यात येते. तसेच हा प्रकल्प एका वर्षातच देशातील सर्व टोल नाक्यांवर लागू केला जाऊ शकतो. यासंबंधीचा प्रोजेक्ट भगवंत गुणाले यांनी बनवला. तो देशाच्या टॉप फाईव्हमध्ये गणला गेला. भगवंत गुणाले यांच्या या कार्याचे पाटोदा बुद्रुक गावातून तसेच जळकोट तालुक्यातून कौतुक होत आहे.

भगवंत यांनी एनआयटी राहुरकेला (ओडिशा) येथे आयटीचे शिक्षण घेतले. त्याचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद पाटोदा व ज्ञान विकास विद्यालय पाटोदा येथे पूर्ण झाले. त्यानंतर उदगीर येथील विद्यावर्धिनी शाळेत तो दहावीत पहिला आला. उच्च माध्यमिक शिक्षण हावगी स्वामी विद्यालय उदगीर येथे पूर्ण झाले.

बदलाचे पंतप्रधान मोदी यांना श्रेय
भगवंत गुणाले यांनी या सर्व प्रगतीचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या शासनातील अमुलाग्र बदलांना व धोरणांना दिले. डिजीटल इंडिया, स्टार्टअप इंडिया, मेक ईन इंडिया यामुळे हे सर्वांसमोर मांडता आले.

स्टार्टअपची संख्या वाढली
देशात २०१५ मध्ये केवळ ५०० स्टार्टअप उद्योग होते आणि आज ही संख्या बरीच वाढली असून, आता ती ७० हजारांवर पोहोचली आहे. यातून रोजगाराच्या संधी वाढल्या आहेत आणि आपला देश सर्वात मोठी जागतिक व आर्थिक महासत्ता बनण्याच्या मार्गावर असल्याचे गुणालेने एकमतशी बोलताना सांगितले. तसेच मंथन कार्यक्रमातून खरोखरच अमृत मिळाल्याचे त्याने सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या