28.3 C
Latur
Thursday, March 30, 2023
Homeमहाराष्ट्रबच्चू कडूंना दिलासा; जामीन मंजूर

बच्चू कडूंना दिलासा; जामीन मंजूर

एकमत ऑनलाईन

मुंबई : प्रहार पक्षाचे आमदार बच्चू कडू यांना मोठा दिलासा मिळाला आहे. बच्चू कडू यांचा तात्पुरता जामीन मंजूर करण्यात आला आहे. सरकारी कामांत अडथळा आणल्या प्रकरणी त्यांना कोर्टाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे.

बच्चू कडू यांचा तात्पुरता जामीन मंजूर करण्यात आला आहे. वरच्या कोर्टात अपीलाच्या कालावधी पर्यंत त्यांना जामीन मिळाला आहे. १५ हजारांच्या जातमुचलक्यावर बच्चू कडू यांना हा मोठा दिलासा मिळाला आहे.

२०१७ ला एका आंदोलनादरम्यान बच्चू कडू यांनी सरकारी कामांत अडथळा आणला होता. त्यावेळी रकारी कामात अडथळा आणि अधिका-यासोबत गैरवर्तणूक केल्याप्रकरणी नाशिक महापालिकेचे आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी बच्चू कडू यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

बच्चू कडू यांना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. सरकारी कामात अडथळा आणि आणि अधिका-यासोबत गैरवर्तणूक केल्याप्रकरणी न्यायालयाने हा मोठा निर्णय दिला आहे.

२०१७ साली नाशिक महापालिकेवर प्रहार संघटनेच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं होत. यावेळी बच्चू कडू यांनी तत्कालीन महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांची भेट घेतली होती.

या भेटीदरम्यान त्यांच्यात शाब्दिक वाद झाला. यावेळी बच्चू कडू यांचा संयम सुटला आणि ते आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्या अंगावर धावून गेले. त्यांनी आयुक्तांना शिवीगाळ करत त्यांच्यावर हात उगारल्याचा दावा केला जातो.

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या