मुंबई : आमदार बच्चू कडुंच्या मंत्रालयातील आंदोलन प्रकरणातील सुनावणी ३ एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. मरीन ड्राईव्ह परिसरात बच्चू कडू यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोर्ट कामकाजासाठी उपलब्ध नसल्याने सत्र न्यायालयातील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. बच्चू कडू यांनी मंत्रायलयात आंदोलन केले होते.
२६ सप्टेंबर २०१८ रोजी एका सरकारी पोर्टलला विरोध करीत आंदोलन करण्यात आले होते. त्या वेळी बच्चू कडू यांनी मंत्रालयात असलेले तत्कालीन संचालक प्रदीप जैन यांच्यासोबत बाचाबाची करून त्यांना मारहाण केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी कडू यांच्याविरोधात मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी आरोप निश्चितीसाठी सध्या सत्र न्यायालयात सुनावणी सुरू आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर बोलताना आसाममध्ये लोक कुत्रे खातात असे विधान केले होते. यानंतर आसाममधील विधानसभेत जोरदार गदारोळ झाला आहे. बच्चू कडूंच्या अटकेचीही मागणी करण्यात आली आहे.