26.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeराष्ट्रीयविकावू विकले, पण लोक शांत कसे बसले?

विकावू विकले, पण लोक शांत कसे बसले?

एकमत ऑनलाईन

तुषार गांधी यांचा सवाल, जनतेच्या न्यायालयात सर्वांत मोठी सौदेबाजी
सातारा : महाराष्ट्रात लोकशाहीची हत्या झाली. ही सर्वात शरमेची बाब आहे. जनतेच्या न्यायालयात सगळ््यात मोठी सौदेबाजी करण्यात आली. ज्यांनी हत्या केली, मला त्यांच्याशी काहीच घेणे देणे नाही. कारण जी विकावू गोष्ट होती, ती विकली गेली; पण माझा सवाल महाराष्ट्राच्या जनतेला आहे, जनता शांत का बसली, एवढा मोठा विश्वासघात जनतेने सहनच कसा केला, असा सवाल करीत महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी भाजप आणि शिंदे गटासह केंद्रातील मोदी सरकारवर घणाघात केला.

ज्येष्ठ विचारवंत दिवंगत यशवंतराव मोहिते यांच्या स्मृतिदिनासाठी सातारा येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते, त्यांनी यावेळी भाजपचा समाचार घेतला. भाजपला टोला लगावताना तुषार गांधी म्हणाले की, जिवंत गांधी ज्यांना खटकायचे, त्यांना मारलेले गांधी आज जास्तच त्रास देत आहेत. मजबुरी का नाम गांधी, असे म्हणणा-­यांचे आज गांधीशिवाय काही चालत नाही आणि गांधीजी त्यांना झेपतही नाहीत. त्यामुळे गांधींची स्मृती भ्रष्ट करण्याचा कार्यक्रम राबविला जात आहे, असा आरोप त्यांनी केला.

देशातील वातावरण चिंतेचे
तुषार गांधी म्हणाले की, सध्या देशातील वातावरण खूपच चिंतेचे आहे. पण आमच्यासारख्यांनी कधी आशा सोडलेली नाही आणि सोडणारही नाही. आम्ही आमचे विचार घेऊन वाटचाल करणारच आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीसुद्धा आमच्या गुणांची दखल घेत आम्हाला आंदोलनजीवी म्हटले आहे. त्याचे आम्हाला कौतुकच वाटते.

विचार कुणीही हरवू शकत नाही
तुषार गांधी म्हणाले की, काँग्रेसला भव्य परंपरा आहे. परंतु आज त्यांनाच त्याची जाणीव करून देण्याची गरज आहे. देशात इतिहास असणारा काँग्रेस हा एकच पक्ष आहे. कारण देशाच्या उभारणीत काँग्रेसचा मोठा वाटा आहे. त्यामुळे काँग्रेसने या इतिहासाचा अभिमान बाळगावा. तो इतिहास नव्या पिढीसमोर जोमाने घेऊन जावे. मग या विचाराला कोणी हरवू शकणार नाही, असेही गांधी म्हणाले.

पोलादी छातीवाल्यांना इतिहास नाही
ज्यांच्याकडे इतिहास नाही ते ५६ इंच छातीवाले बढाया मारत फिरत आहेत. पण ज्या पोलादी छातींनी गोळ््या झेलल्या ते काँग्रेसवाले गप्प का, हे समजत नाही, अशा शब्दांत तुषार गांधींनी काँग्रेसला फटकारले. महात्मा गांधी लोकांना आवाहन करण्यापूर्वी स्वत: झोकून देऊन काम करीत असत. त्यामुळे त्यांना प्रतिसाद मिळत असे. पण, आज दुर्दैवाने काँग्रेसकडे अनुकरणीय नेतृत्व नाही. करो या मरो नव्हे तर करेंगे या मरेंगे, असा महात्मा गांधींचा नारा असायचा. याचा अभ्यास आजच्या काँग्रेसने करणे गरजेचे असल्याचे तुषार गांधी म्हणाले.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या