23.8 C
Latur
Friday, September 24, 2021
Homeमहाराष्ट्रसोमय्यांचे मुश्रिफांवर १२७ कोटींच्या घोटाळ्याचा आरोप

सोमय्यांचे मुश्रिफांवर १२७ कोटींच्या घोटाळ्याचा आरोप

एकमत ऑनलाईन

मुंबई: भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह त्यांच्या कुटुंबावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले.
हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांनी विविध माध्यमांतून भ्रष्टाचार आणि घोटाळे करत शेकडो कोटींची बेनामी संपत्ती जमवल्याचा आरोप सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत केला. मुश्रीफ यांच्या विरोधात किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत तब्बल २७०० पानांचे पुरावे सादर केले. विशेष म्हणजे प्राप्तीकर विभागाकडे आधीच हे पुरावे सादर केल्याचंही सोमय्या म्हणाले. ठाकरे सरकारमधल्या नेत्यांवर सोमय्या एकापाठोपाठ आरोप करत आहेत. सोमवारी आणखी एका मंत्र्यांचे घोटाळे उघड करणार असल्याचा इशारा सोमय्या यांनी दिला होता. त्यानुसार सोमवारी पत्रकार परिषदेत सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर शेकडो कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केले.

दरम्यान, हसन मुश्रीफ यांनी सोमय्या यांचे हे आरोप फेटाळले आहेत. किरीट सोमय्या यांच्यावर १०० कोटींच्या अब्रूनुकसानीचा दावा करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

२७०० पानांचे पुरावे
२७०० पानांच्या पुराव्यामध्ये हसन मुश्रीफ, त्यांच्या पत्नी साहेरा आणि त्यांचा मुलगा नावीद मुश्रीफ या तिघांनी वेगवेगळ्या माध्यमांमधून घोटाळे केल्याचा आरोप त्यांनी केली. सोमय्या यांनी हे पुरावे प्राप्तीकर विभागाकडे यापूर्वीच सादर केलेले असल्याची माहितीही यावेळी दिली.

सोमय्यांवर १०० कोटींचा दावा करणार
हसन मुश्रीफ यांनी किरीट सोमय्या यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांच्या विरोधात कोल्हापूर सत्र न्यायालयात १०० कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा करणार असल्याचं मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. यापूर्वीही माझ्यावर आरोप झाले, तेव्हा प्रत्येकवेळी मी दावे केले आहेत. हा सातवा दावा असेल. माझ्यावर लोकांच्या असलेल्या विश्वासाला तडा जाऊ नये यासाठी ते गरजेचं असल्याचं मुश्रीफ म्हणाले.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या