27 C
Latur
Saturday, August 13, 2022
Homeमहाराष्ट्रपरबविरोधात सोमय्यांची उच्च न्यायालयात याचिका

परबविरोधात सोमय्यांची उच्च न्यायालयात याचिका

एकमत ऑनलाईन

मुंबई : दापोलीमधील रिसॉर्टच्या बांधकामामुळे अडचणीत आलेले शिवसेनेचे आमदार अनिल परब यांच्याविरोधात आता भाजपचे किरीट सोमय्या यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. तसेच या प्रकरणात सीबीआय आणि ईडी तपासाची मागणी त्यांनी केली आहे.

परब यांनी सागरी किनारा नियमांचे उल्लंघन करून आणि विनापरवानगी दापोलीत रिसॉर्ट बांधले आहे, असा आरोप सोमय्या यांनी यापूर्वी अनेकदा केला आहे. आता याबाबत त्यांनी थेट उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करून नव्याने या तपासाची मागणी केली आहे. सीबीआय, ईडी किंवा अन्य तपास यंत्रणेमार्फत यावर चौकशी करावी, संबंधित कथित अनधिकृत रिसॉर्ट जमीनदोस्त करावे आणि दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी याचिकेत केली आहे. अ‍ॅड. अखिलेश दुबे यांच्यामार्फत ही याचिका त्यांनी दाखल केली आहे. शुक्रवारी न्या. रेवती मोहिते-डेरे यांच्या खंडपीठापुढे या याचिकेचा उल्लेख करण्यात आला. न्यायालयाने यावर २२ जुलै रोजी सुनावणी निश्चित केली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या