26.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeमहाराष्ट्रमुंबईतील अनधिकृत गगनचुंबी इमारतींवर सोमय्यांचा मोर्चा

मुंबईतील अनधिकृत गगनचुंबी इमारतींवर सोमय्यांचा मोर्चा

एकमत ऑनलाईन

मुंबई : विविध प्रकारचे घोटाळे बाहेर काढून राजका-यांना जेरीस आणणा-या भाजप नेते किरीट सोमय्यांनी आता त्यांचा मोर्चा मुंबईतील अनधिकृत गगनचुंबी इमारतींवर वळवला आहे. याबाबत त्यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे.

यात नोएडामधील अनधिकृत टॉवर्सवर ज्याप्रमाणे कारवाई करण्यात आली त्याप्रमाणे मुंबईतील अनधिकृत इमारतीचं काय? असा सवाल उपस्थित करत कारवाईची मागणी केली आहे. काल नोएडातील अनधिकृत ट्विन टॉवर पाडण्यात आले.
मुंबईत असे शेकडो अनधिकृत टॉवर आणि हजारो अनधिकृत मजले गेली अनेक वर्ष बांधण्यात आले आहेत. त्यामुळे लाखो कुटुंबिय चिंतेत आहे. ते मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

मुंबईतही अनेक बिल्डरांकडून इमारतींना ओसी मिळण्यासाठी प्रयत्नच केले गेलेले नसून, यामुळे रहिवाशांना मोठ्या प्रमाणात अडचणींना सामोरं जावे लागत आहे. त्यामुळे बिल्डर आणि महापालिकेचे भ्रष्ट अधिका-यांचे विशेष ऑडिट करण्याची मागणी सोमय्यांनी केली आहे. मुंबईत भोगवटा प्रमाणपत्र न मिळालेले शेकडो टॉवर्स आहेत.

माझ्या माहितीप्रमाणे २५ हजाराहून फ्लॅटधारक ओसी न मिळाल्यानेचिंतेत आहेत. त्यामुळे २५ हजाराहून अधिक मध्यमवर्गीय सदनिकाधारकांचे रक्षण करण्याची मागणी आपण शिंदे आणि फडणवीस यांच्याकडे केल्याचे सोमय्या म्हणाले.

किशोरी पेडणेकर यांनी बेनामी गाळ्यांचा ताबा घेतल्याप्रकरणी पुन्हा एकदा मी एसआरए प्राधिकरणात जाऊन कारवाईची मागणी केली असल्याचेही सोमय्यांनी यावेळी सांगितले. वरळीमध्ये अर्धा डझन अधिक बेनामी गाळे पेडणेकर यांनी ताब्यात घेतल्याचा आरोपही यावेळी त्यांनी केला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या