28.1 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeमहाराष्ट्रकाही लोकांना मुख्यमंत्री झाल्याचा भास होतोय

काही लोकांना मुख्यमंत्री झाल्याचा भास होतोय

एकमत ऑनलाईन

  सुजय विखेंचा निलेश लंके यांना टोला
अहमदनगर : काही लोकांना कमी काळात आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्याचा भास झाला, त्याला आपण काही करू शकत नाही, अशी टीका नाव न घेता सुजय विखे यांनी आमदार निलेश लंके यांच्यावर केली आहे. भाजपा आयोजित एका कार्यक्रमात सुजय विखे यांनी हा घणाघात केला आहे. ते म्हणाले, की कुणाला वाटत असेल सुजय विखे कुणाला घाबरतो, सुजय विखेला दडपण आले आहे.

मात्र असे अजिबात नाही, असा टोला त्यांनी लगावला. एक महिन्यात पारनेर तालुक्यातून एकही अनधिकृत वाळूचे डंपर जाणार नाही, असा इशारा देखील सुजय विखे यांनी दिला आहे. तसेच तहसीदारांमार्फत धाडी टाकून गरीबांकडून पैसे वसूल करणे पारनेर तालुक्यात आजपासून बंद होणार, असा इशाराच त्यांनी दिला आहे.

जिल्ह्यातील अनधिकृत वाळू उपसासंदर्भात त्यांनी आक्रमक होत हे प्रकार बंद होणार असल्याचे म्हटले आहे. राधाकृष्ण विखे जोपर्यंत महसूल मंत्री आहेत, तोवर एक महिन्यामध्ये एकही अनधिकृत वाळूचे डंपर पारनेर या ठिकाणाहून जाणार नाही, असा विश्वास त्यांनी उपस्थितांना दिला आहे. आम्हाला नको आहेत असे कार्यकर्ते जे वाळू उपसा करतात, आम्हाला नकोत ते गुंड ज्यांच्यापासून समाजाला धोका आहे, असे ते म्हणाले.

काय म्हणाले सुजय विखे?
परिस्थिती बदलत असते. लोक मंत्री होतात-जातात. मात्र काही जणांना कमी काळामध्ये आपण मुख्यमंत्री झाल्याचा भास झाला, त्याला आपण काहीही करू शकत नाही. सहावेळा राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये शपथ घेऊन सहावेळा मुख्यंत्र्यांबरोबर काम करणारा आमदार राधाकृष्ण विखे पाटील होय. तर मागील अडीच वर्षात दिसले नाहीत, असे चेहरे आता समोर येत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या