21.1 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeजिल्ह्यात आजपासून काही दुकाने उघडणार

जिल्ह्यात आजपासून काही दुकाने उघडणार

व्यापा-यांना दिलासा:नागरिकांची चिंता वाढली

एकमत ऑनलाईन

नांदेड : प्रतिनिधी
शहरातील कंटनमेंट झोन वगळून जिल्ह्यातील काही दुकाने आज दि़ १८ पासून ठराविक दिवशी व वेळेत उघडण्यास जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली आहे. व्यापारी आणि ग्राहकांना सर्व सुचनांचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे़दरम्यान व्यापा-यांना यामुळे थोडासा दिलासा मिळणार असला तरी बाजारात होणाºया गर्दीने नागरिकांची चिंता वाढली आहे़

Read More  नांदेड शंभरीच्या उंबरठयावर

कोरोनामुळे लागू झालेल्या लॉकडाऊनने बाजारपेठेतील अत्यावश्यक सेवा वगळता सर्वंच दुकानांना गेल्या दिड महिन्यापासून कुलूप आहे़ मात्र जिल्हाधिकाºयांच्या आदेशाने काही दुकानांचे कुलूप उघडणार आहे़या नव्या आदेशात महानगरपालिका आणि नगरपालिका हद्दीतील शहरी भागातील सर्व मॉल्स, व्यापारी संकूल, आणि बाजारपेठ या बंद राहतील. परंतू अशा व्यापारी संकूलातील व बाजारपेठेमधील अत्यावश्यक वस्तुंची विक्री करणारी दुकाने चालू राहतील. तसेच सर्व एकल दुकाने, वस्तीतील दुकाने, निवासी संकूलातील दुकाने कंटेनमेंट झोन वगळता, शहरी भागात चालू ठेवण्यास व ग्रामीण भागातील सर्व दुकाने (मॉल मधील वगळून) चालू ठेवण्यास परवानगी दिली आहे.

Read More  नांदेडमध्ये मद्यपीना दिलासा

या दुकाने,आस्थापनाच्या‍ ठिकाणी हॅन्डवॉश, सॅनिटायझरचा वापर करणे, एकावेळेस दुकानात ५ पेक्षा जास्त ग्राहकास प्रवेश राहणार नाही. दुकानातील कर्मचारी व ग्राहक यांच्या चेहºयावर मास्क असणे व सामाजिक अंतराचे पालन करणे ठिकाणांचे वेळोवेळी नियमीत निजंर्तूकीकरण करणे, ई वॉलेटस व स्वाईप मशीनद्वारे करण्यास भर द्यावयाचा आहे़या उपाययोजनेचा भंग केल्यास ५ हजार रुपये एवढा दंड संबंधित दुकानदाराकडून आकारण्यात येईल. दुपारी २ वाजेनंतर नमूद आदेशाप्रमाणे संचारबंदी / जमावबंदी आदेश कायम राहतील.

Read More  नवीन १८ रुग्ण पॉझिटिव्ह, नांदेडची रूग्ण संख्या ८४

या आदेशाची अंमलबजावणीच्या देखरेखीसाठी पथके गठीत करुन पर्यवेक्षणाची जबाबादारी निश्चित करण्यात आली आहे. महानगरपालिका हद्दीत- महानगरपालिका, पोलीस विभाग व उपप्रादेशिक परीवहन अधिकारी यांनी संयुक्त पथके गठीत करावीत. नगरपालिका हद्दीत- नगरपालिका, पोलीस विभाग व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी संयुक्त पथके गठीत करावीत. तर गावपातळीवर ग्रामपंचायत व पोलीस विभागाचे संयुक्त पथक गठीत करावे,असेही जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आपल्या आदेशात नमुद केले आहेत.

आज सोमवार पासून जिल्हाधिकाºयांच्या आदेशात नमुद केल्याप्रमाणे परवानगी देण्यात आल्याने दुकाने, अस्थापने सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत सुरू ठेवता येणार आहेत़ यासाठी सुचना व नियम बंधनकारक राहणार आहेत़ याचे उल्लंघन केल्यास दुकानदाराविरूध्द दंडात्मक कारवाई केल्या जाणार आहे़ दरम्यान शहरातील कापड, रेडीमेड, मिठाई , फर्निचर, चप्पर शुज, आदींची दुकाने बंदच राहणार आहेत़ या दुकानांना उघडण्यास कोणतीही परवानगी देण्यात आली नाही़ जिल्हाधिकाºयांच्या या आदेशामुळे काही व्यापारी खुष तर काही व्यापाºयात नाराजीचा सुर आहे़

शहरातील ही दुकाने उघडणार
पाच दिवसाचा आठवडा करण्यात आला आहे़यात सोमवार ते शुक्रवार (शनिवार व रविवार वगळून ) दुकानाचा प्रकार- अ‍ॅटोमोबाईल्स, कॉम्पुटर, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रीकल्स, टायर्स, बॅटरी, मोबाईल शॉपी, रस्सी, वॉच स्टोअर्स, स्टेशनरी / बुक स्टोअर्स (पुस्तकालय), सायकल स्टोअर्स, स्टील ट्रेडर्स, बिल्डींग मटेरीयल या दुकानांची वेळ सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत राहील. रविवार वगळून दररोज किराणा दुकानांची वेळ सकाळी 7 ते दुपारी २ वाजेपर्यंत राहील. रविवारसह दररोज शेतीविषयक-बी, बियाणे, औषधे इत्यादींची वेळ सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यत तर हॉस्पीटल, मेडीकल स्टोअर्स सुरु ठेवण्याची वेळ २४ तास दररोज देण्यात आली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या