28.5 C
Latur
Sunday, November 27, 2022
Homeराष्ट्रीयसोनिया गांधींनी भारत जोडो यात्रेला लावली हजेरी

सोनिया गांधींनी भारत जोडो यात्रेला लावली हजेरी

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज (गुरुवार) कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यात भारत जोडो यात्रेला हजेरी लावली. पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या यात्रेत सोनिया गांधी फक्त १० मिनिटे कार्यकर्त्यांसोबत चालल्या.

यानंतर त्या पुढील प्रवासासाठी रवाना झाल्या. सोनिया गांधींच्या आगमनाने भारत जोडो यात्रेत सहभागी असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून आला. कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत सुरू असलेल्या काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला ३७०० किमीहून अधिक अंतर कापावे लागणार आहे.

सोनिया गांधींनी मंड्या जिल्ह्यातील डाकबंगला भागातून पदयात्रेला सुरुवात केली. त्या प्रथमच भारत जोडो यात्रेत सामील झाल्या. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोनियांची ही पदयात्रा महत्त्वाची मानली जात आहे. काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल म्हणाले, ‘सोनिया गांधी या यात्रेत सामील झाल्या, हा ऐतिहासिक क्षण आहे. त्यामुळे कर्नाटकात पक्ष आणखी मजबूत होईल.’

कर्नाटकात विजय आमचाच असेल : डी. के. शिवकुमार
यादरम्यान कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार म्हणाले, सोनिया गांधी कर्नाटकात आल्या आणि त्या भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्या, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. येत्या काळात राज्यात आमची सत्ता येणार असून भाजपची दुकानदारी बंद होणार आहे, असा इशारा त्यांनी मुख्यमंत्री बोम्मई सरकारला दिला.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या