32 C
Latur
Monday, March 27, 2023
Homeक्रीडासोफी नावाचे वादळ पुन्हा घोंगावले

सोफी नावाचे वादळ पुन्हा घोंगावले

एकमत ऑनलाईन

आरसीबीचा शानदार विजय
मुंबई : महिला प्रीमियर लीगमधील १६ व्या सामन्यात मुंबईच्या ब्रेबॉर्नवर स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बेगलोर आणि गुजरात जायंट्स हे दोन संघ भिडले. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना गुजरात जायंट्सने ४ बाद १८८ धावांचा डोंगर उभा केला होता. परंतु आरसीबीच्या महिला खेळाडूंसमोर हा डोंगर म्हणजे टेकडी वाटू लागला. कारण आरसीबीची सलामीवीर आणि आक्रमक फलंदाज सोफी डिवाईनने हा सामना एकहाती जिंकला. आज ब्रेबोर्नच्या मैदानात सोफी नावाचे वादळ पाहायला मिळाले.

सोफीने या सामन्यात अवघ्या ३६ चेंडूत ८ षटकार आणि ९ चौकारांच्या मदतीने ९९ धावा फटकावल्या. सोफीचे शतक अवघ्या एका धावेने हुकले. ती शतक साजरे करू शकली नसली तरी बाद होण्यापूर्वी तिने आरसीबीला विजयाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवले होते. त्यानंतर उर्वरित कामगिरी एलिस पेरी आणि हेदर नाईट या दोघींनी पूर्ण केली. १८९ धावांचे लक्ष्य आरसीबीने १६ व्या षटकात पूर्ण केले. आरसीबीने ८ फलंदाज आणि २७ चेंडू राखून गुजरात जायंट्सचा पराभव केला. हा आरसीबीचा सलग दुसरा विजय आहे. या विजयासह आरसीबीने त्यांच्या प्लेऑफच्या आशा जीवंत ठेवल्या आहेत.

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या