24.4 C
Latur
Friday, July 1, 2022
Homeराष्ट्रीयगांगुलीचे भावूक ट्विट, बीसीसीआयचा खुलासा

गांगुलीचे भावूक ट्विट, बीसीसीआयचा खुलासा

एकमत ऑनलाईन

अध्यक्षपद सोडल्याच्या ट्विटने चर्चांना उधाण
नवी दिल्ली : बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी भावूक ट्विट करीत लवकरच नवी इनिंग सुरू करणार असल्याचे म्हटले आहे. यावरून त्यांनी बीसीसीआय अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचीही चर्चा रंगली आहे. परंतु बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी बीसीसीआय अध्यक्षपद सोडल्याच्या वृत्ताचा इन्कार केला आहे. दरम्यान, सौरभ गांगुली आगामी काळात बीसीसीआय अध्यक्षपद सोडून राजकारणाची नवी इनिंग सुरू करणार असल्याच्या चर्चांनाही उधाण आले आहे.
सौरभ गांगुली यांनी भावूक ट्विट करताना आतापर्यंतच्या प्रवासात सोबत असणा-या चाहत्यांचे आणि खेळाडूंचे आभार व्यक्त केले आणि पुढील वाटचालीसाठी लोकांकडून समर्थनही मागितले आहे. अर्थात, सुरुवातीलाच त्यांनी लवकरच नवी इनिंग सुरू करणार असल्याचे जाहीर केल्याने चर्चांना उधाण आले आहे. अर्थात, या ट्वीटनंतर सौरभने राजीनामा दिल्याची चर्चा सुरू झाली. सोशल मीडियावर ट्रेंडही सुरू झाला. मात्र, बीसीसीआय सचिव जय शाह यांनी सौरव गांगुली यांनी राजीनामा दिला नसल्याची माहिती दिली.

ऑक्टोबर २०२२ मध्ये सौरव गांगुली यांचा बीसीसीआय अध्यक्ष म्हणून कार्यकाळ संपणार आहे. ऑक्टोबर २०१९ मध्ये सौरव गांगुली यांनी बीसीसीआय अध्यक्ष म्हणून पदभार सांभाळला होता. त्याआधी सौरव गांगुली यांनी बंगाल क्रिकेट संघाचे प्रमुख म्हणून काम पाहिले आहे.

सौरव गांगुलीचे ट्विट
२०२२ माझ्यासाठी खूप महत्वाचे वर्ष आहे. कारण क्रिकेटमध्ये करिअर सुरू करून ३० वर्षे पूर्ण झाली. १९९२ मध्ये क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती. ३० वर्षांच्या प्रवासात सर्वांकडूनच सपोर्ट मिळाला. क्रिकेटने मला खूप काही दिले. या प्रवासात मला अनेकांनी मदत केली, त्या सर्वांचे धन्यवाद. आता नवी इनिंग सुरू करणार आहे. यामध्ये सर्वांचा सपोर्ट मिळेल, अशी अपेक्षा आहे.

गांगुलीचा राजीनामा नाही
बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी अद्याप बीसीसीआय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला नाही, अशी माहिती बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी एएनआयला दिली. बुधवारी सायंकाळी सौरव गांगुली यांनी ट्वीट करत नवी इनिंग सुरू करणार असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर बीसीसीआय अध्यक्षपद सोडल्याच्या चर्चेला उधाण आले होते. त्यावर जय शहा यांनी खुलासा केला.

शिक्षण क्षेत्रात पदार्पण!
सौरव गांगुली राजकारणात प्रवेश करण्याच्या चर्चेला उधाण आलेले असतानाच त्यांनी बीसीसीआय अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला नाही, असे स्पष्ट केले. आपण नवीन एज्युकेशन अ‍ॅप लाँच करणार आहोत. त्यासाठी जनतेचा पाठिंबा हवा आहे, असेही म्हटले. बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सौरव गांगुली शिक्षण क्षेत्रात नवीन कंपनी लाँच करणार आहेत.

 

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या