27.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeक्रीडासौरव गांगुली होणार आयसीसीचे अध्यक्ष?

सौरव गांगुली होणार आयसीसीचे अध्यक्ष?

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारताचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांना आता आयसीसीच्या अध्यक्षपदाचे वेध लागलेले आहेत. विश्वचषक सुरु असताना गांगुली हे आयसीसीचे अध्यक्ष असू शकतात.

सध्याच्या घडीला सौरव गांगुली हे बीसीसीआयचे अध्यक्ष आहेत. पण हे अध्यक्षपद आता जय शाह स्विकारणार असल्याचे चित्र दिसत आहे. कारण जय शहा यांना पंधरा राज्य संघटनांचा अध्यक्षपदासाठी पाठिंबा आहे. त्यामुळे पुढच्या कार्यकाळासाठी तेच अध्यक्ष बनतील, हे जवळपास स्पष्ट झाले आहे. त्याचबरोबर गांगुली आता थेट आयसीसीवर जाणार असल्याची चर्चा आहे. कारण येत्या काही दिवसांमध्ये आयसीसीचे अध्यक्षपद रिक्त होणार आहे.

सध्याच्या घडीला न्यूझीलंडचे ग्रेग बार्कले हे आयसीसीचे अध्यक्ष आहेत. बार्कले यांनी नोव्हेंबर २०२० साली आयसीसीचे अध्यक्षपद स्विकारले होता. बार्कले यांच्या अध्यक्षपदाचा काळ ऑक्टोबर २०२२ मध्ये संपुष्टात येणार आहे. ट्वेन्टी-२० विश्वचषकही याच कालावधीमध्ये आहे. त्यामुळे विश्वचषकापूर्वी आयसीसीच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्यात येईल आणि सौरव गांगुली आयसीसीच्या अध्यक्षपदासाठी उभे राहतील.

जर ही निवडणूक बिनविरोध झाली तर गांगुली हे आयसीसीच्या अध्यक्षपदार विराजमान होतील. पण जर गांगुली यांच्यासमोर जर कोणी उभे राहिले तर निवडणूक घेण्यात येईल. पण सध्याच्या घडीला तरी भारत ही क्रिकेटमधील महासत्ता आहे, त्यामुळे गांगुली यांच्याविरोधात कोणी उभे राहण्याची जोखीम घेणार नाही. पण जर कोणी उभे राहण्याचा प्रयत्न केला तरी गांगुली ही निवडणूक जिंकू शकतील. त्यामुळे गांगुली हे पुढचे आयसीसीचे अध्यक्ष होणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या