21.1 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeमहाराष्ट्ररश्मी ठाकरेंनी हाती घेतली सूत्रे ; बंडखोर आमदारांच्या पत्नींना केला फोन

रश्मी ठाकरेंनी हाती घेतली सूत्रे ; बंडखोर आमदारांच्या पत्नींना केला फोन

एकमत ऑनलाईन

मुंबई : एकनाथ शिंदेसह आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेना मोठ्या संकटात सापडली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीसमोरच्या अडचणी वाढल्या असून, सरकार राहणार की जाणार अशा चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी आता शिवसेनेचा मोर्चा हातात घेतला आहे. रश्मी ठाकरे यांनी बंडखोर आमदारांच्या पत्नींना फोन करून समजवण्याचा प्रयत्न केला आहे.

बंडखोर आमदारांना समजवण्याचा प्रयत्न शिवसेनेच्या अनेक वरिष्ठ नेत्यांकडून केला गेला. मात्र, त्याचा काहाही उपयोग झाला नाही. त्यानंतर स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील सर्व बंडखोरांना समजवण्याचा प्रयत्न केला, मात्र ते त्यांचेही ऐकेनासे झाले. त्यामुळे उद्धव ठाकरे त्या बंडखोरांवर कारवाई करण्याच्या तयारीत आहेत. उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांशी मॅसेज करून चर्चा केली होती. बंडखोर आमदारांचे म्हणणे आहे की, ते सध्या शिवसेनेतच आहेत. बंडखोर आमदार आपण शिवसेनेसोबत असल्याचे सांगत आहेत मात्र, ते गुवाहटीतून मुंबईत यायला तयार नाहीत.

त्यामुळे शिवसेनेत सध्या संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. रश्मी ठाकरे यांनी बंडखोर आमदारांच्या पत्नींना फोन करून त्यांना समजवण्याचे सांगितले आहे. उद्धव ठाकरे यांनी काही आमदारांना गुवाहटीतून परत मुंबईत आणणार असा विश्वास व्यक्त केला आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी १६ आमदारांना कारवाईची नोटीस बजावली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या